Car Modification Challan: प्रत्येकाचं स्वप्न असतं की आपल्या दारात गाडी असायला हवी. पण कंपनीकडून गाडी घेतल्यानंतरही आपली गाडी वेगळी वाटावी आणि सर्वांचं लक्ष वेधून घेतलं पाहीजे, असा अट्टाहास असतो. प्रत्येक कंपनी आपल्या मॉडेलप्रमाणे सुविधा देते. त्यामुळे काही जण गाडीत बदल करतात. इतरांचं लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न असतो. तुम्हीही गाडीत काही बदल करू इच्छित असाल तर ही बातमी एकदा वाचा, नाहीतर तुम्हाला मोठा दंड भरावा लागू शकतो. गाडीत ठरावीक बदल केल्यास तुमच्या गाडीवर वाहतूक पोलिसांची लगेचच नजर पडेल. वाहतूक पोलीस तात्काळ गाडी बाजूला घेऊन तुम्हाला दंड ठोठावतील. चला तर जाणून घेऊयात गाडीमध्ये कोणते बदल केले तर दंड भरावा लागू शकतो.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गाडीच्या काचा
कंपनी प्रत्येक गाडीला आरपार स्पष्ट दिसेल अशा काचा बसवते. पण काही जण सूर्यप्रकाश किंवा गाडीतील प्राव्हेयसी राखण्यासाठी काचा काळा टिंटेड पेपर लावतात. जर तुम्हीही असाच विचार करत असाल तर जरा थांबा, पण असं करणं आता गुन्हा असून तुम्हाला दंड भरावा लागेल. कारण कारच्या मागच्या काचेची विजिबिलिटी कमीत कमी 75 टक्के असणं आवश्यक आहे. त्याचबरोबर साइडच्या डोअर काचांची विजिबिलिटी 50 टक्के असणं गरजेचं आहे. 


हॉर्न
अनेक वेळा गाडीसोबत आलेले हॉर्न काढून विचित्र हॉर्न लावले जातात. असा बदल बेकायदेशीर असून तुम्हाला दंड भरावा लागेल. पोलिसांना एखाद्या गाडीत फॅन्सी सायरन आणि प्रेशर हॉर्न दिसला, तर ते लगेच गाडी थांबवतात आणि चालान कापतात. 


सायलेन्सर
काही जण त्यांच्या कारचे सायलेन्सर बदलतात, कारण त्यांना मूळ आवाज आवडत नाही. पण असं अजिबात करू नये. असा बदल तुम्हाला अडचणीत आणेल आणि तुम्हाला दंड भरावा लागेल. 


नंबर प्लेट
काही जणांना कारच्या नंबर्सबाबत जबरदस्त आकर्षण असतं. त्यामुळे फॅन्सी नंबरचा आग्रह धरतात. पण हे नंबर खूपच महागडे असल्याने पदरी निराशा पडते. त्यामुळे जो नंबर मिळाला त्यात फेरफार केला जातो. पण अशी चूक करू नका, कारण नंबर प्लेटवर पोलिसांची करडी नजर असते. नंबर प्लेटमध्ये कोणताही बदल दिसल्यास पोलीस कारवाई करत दंड ठोठावतात.