मुंबई : Whatsapp हे संवादाचं माध्यम असलं तरी अजूनही Gmail चा रोल तेवढाच महत्त्वाचा आहे. इतर सोशल मीडिया अॅपवर जाण्यासाठी किंवा कामाचे महत्त्वाचे मेल करण्यासाठी आपण Gmail अगदी सहज वापरतो. Gmail ही जगात सर्वात जास्त वापरली जाणारी सेवा आहे. युजर्सच्या सुरक्षेच्या अनुषंगाने या अॅपने काही नियम तयार केले आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नियमांचं पालन केलं नाही किंवा नियम मोडला तर Gmail अकाउंट बॅन होऊ शकतं. यासाठी जाणून घेऊया की कोणत्या चुका टाळायला हव्यात ज्यामुळे आपलं Gmail अकाउंट ब्लॉक होणार नाही. 


तुम्हाला वाटत असेल की आपण दिवसभरात अगणित मेल पाठवू शकतो तर तुमचा हा समज चुकीचा आहे. गूगलने Gmail साठी काही नियम केले आहेत. एक लिमिट सेट केलं आहे. त्यापेक्षा जास्त मेल जर पाठवले तर तुमचं खातं बॅन होऊ शकतं. 


युजर दिवसाला 500 हून अधिक मेल पाठवू शकत नाही. जर दिवसाला 500 हून अधिक मेल जात असतील तर तुमचं खातं बॅन होऊ शकतं. तुम्ही जर स्पॅम मेसेज पाठवण्याचा प्रयत्न करत असाल तरीही देखील तुमचं खातं बॅन होऊ शकतं. अशा परिस्थितीमध्ये तुमचं खातं 24 तासांसाठी बॅन होऊ शकतं. जर तुमच्याकडून ही गोष्टं वारंवार घडली तर तुमचं खातं कायमसाठी बंद केलं जाऊ शकतं. 


तुम्ही जर इनअॅक्टीव्ह ईमेल Address वर सतत मेल पाठवले तर गूगल तुमच्या अकाउंटला रेड प्लॅग लावले. गूगलचं अल्गोरीदम तुमचं खातं स्पॅम समजेल आणि तुम्हाला तात्पुरतं बॅन करेल.चुकीच्या ईमेल पत्त्यावर कोणताही मेल पाठवला तर तुम्हाला पाठवलेला ई-मेल परत येतो. त्यामुळे चुकीच्या ईमेल आयडीवर पुन्हा पुन्हा मेल करू नका हे लक्षात ठेवा.


ई मेलच्या सहाय्याने चुकीच्या गोष्टी करू नका. हत्यार, ड्रग्स, तस्करी, अवैध मटेरियल किंवा व्हिडीओ फोटो पाठवण्यासाठी बंदी आहे. असे कोणतेही कृत्य निदर्शनात आलं तर तुमचं खातं बॅन होऊ शकतं.