मुंबई : सध्याच्या डिजिटल युगात आपला स्मार्टफोन हा खुप महत्वाची भूमिका बजावतो. आपल्या फोनमध्ये आपले सगळे डॉक्युमेंट सेव्ह करतो, तसेच आपण त्यावरुन पैशांचे ट्रान्झॅक्शन करतो. आपल्या फोनमध्ये अनेक महत्वाच्या गोष्टी असतात. फोनमध्ये आपण आपले अनेक पासवर्ड देखील सेव्ह करतो. हे पासवर्ड गुगल क्रोम किंवा मायक्रोसॉफ्ट एज सारख्या ब्राउझरवर सेव्ह होतात आणि आपल्यापैकी प्रत्येकजण ते करतंच. परंतु तुम्ही असं करत असाल तर तुम्हाला सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

काही IT संशोधकांनी इंटरनेट वापरकर्त्यांना, विशेषत: घरून काम करणार्‍या कर्मचार्‍यांना एक चेतावणी दिली आहे, की ब्राउझरवर सेव्ह केलेला त्यांचा लॉगिन-पासवर्ड हॅक होऊ शकतो. अलीकडेच, सुरक्षेच्या उल्लंघनामुळे एका कंपनीचा डेटा लीक झाला आहे.


या कंपनीत काम करणारे कर्मचारी घरून काम करायचे. काम करण्यासाठी ते एक उपकरण वापरत होते, जो इतर लोक देखील वापरत होते. या उपकरणात रेडलाइन स्टीलर नावाचा मालवेअर लपलेला असल्याची माहिती त्यांना नव्हती.


मालवेअर कंपनीच्या व्हीपीएनमध्ये प्रवेश करण्यासाठी संवेदनशील खाते तपशील आणि पासवर्ड चोरतो. त्यानंतर हॅकर्स या डेटाचा वापर कंपन्यांच्या खासगी डेटाची हेरगिरी करण्यासाठी करतात.


अँटीव्हायरस देखील काम करत नाही


यामध्ये सर्वात धोकादायक गोष्ट म्हणजे तुमच्याकडे अँटीव्हायरस सॉफ्टवेअर इन्स्टॉल केलेले असले तरीही हा मालवेअर कंप्युटर किंवा लॅपटॉपमध्ये प्रवेश करु शकतो. मालवेअरबद्दल बोलताना तज्ज्ञांनी सांगितले की, खाते ब्राउझरमध्ये क्रेडेन्शियल्स सेव्ह करणे खूप सोयीचे असले तरी, जर हा मालवेअर तुमच्या लॅपटॉपमध्ये घुसला तर खाते क्रेडेंशियल्स धोक्यात येईल.


यापासून कसे बचाव करता येईल?


> अशा प्रकारची समस्या टाळण्यासाठी सामान्य वापरकर्त्यांनी हे लक्षात ठेवावे की, त्यांनी नेहमी अधिकृत ऍप्सचाच वापर करावा.
> त्यांनी आपल्या अधिकृत कामासाठी असे कोणतेही उपकरण वापरू नये, जे इतर लोकही वापरत असतील.
> अनेक वेळा असे अॅप्स प्ले स्टोअरवरही आढळतात, ज्यामध्ये मालवेअर दडलेले असते.
> अॅप डाउनलोड करण्यापूर्वी वापरकर्त्यांनी अतिरिक्त काळजी घ्यावी आणि त्याची पार्श्वभूमी तपासावी.