नवी दिल्ली : अनेक वेबसाइटवर लॉगिन करण्याचे दोन पर्याय असतात. एक म्हणजे आपण पूर्ण माहिती सबमिट करतो किंवा जिमेल खात्याच्या एक्सेस देऊन त्या वेबसाइटवर (Website)वर लॉगिन करतो. आपलं जीमेल अकाऊंट त्या वेबसाईटशी लिंक केल्यानंतर पासवर्डची गरज लागत नाही. काही वेळाने आपण ती वेबसाइट वापरणे थांबवतो. पण जीमेल अकाऊंटशी लिंक कायम राहून जाते. अशा किती वेबसाईटशी तुमचे जीमेल अकाऊंट लिंक आहे हे समजले तर तुम्ही वेळीच ते डिलिंक करु शकता.


मोबाईलवरुन शोधा 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आपले जीमेल खाते किती वेबसाइट्सशी लिंक केले गेले आहे हे मोबाईलवरुन जाणून घेऊ शकता. यासाठी मोबाइलच्या जीमेल अ‍ॅपवर नव्हे तर गुगल क्रोमवर जीमेल उघडणे आवश्यक आहे. ज्या जीमेल अकाऊंटबद्दल तुम्हाला माहिती हवी आहे त्याचा ईमेल आयडी आणि पासवर्ड तुम्हाला टाकावा लागेल. 



गूगल क्रोममध्ये लॉगिन केल्यानंतर तुम्हाला नॉर्मल पेज दिसेल. स्क्रोल केल्यानंतर सर्वात खाली जावे लागेल. जिथे तुम्हाला View Gmail in (Mobile/ Older Version/ Dekstop) दिसेल. तुम्हाला डेक्सटॉपवप क्लिक करावे लागेल. तिथे तुम्हाल जीमेल दिसेल आणि सर्व मेल्स दिसतील. या पेजवर स्कोल करुन सर्वात खाली यावे लागेल. 


इथे तुम्ही वापरलेल्या जीमेलची माहिती असेल. यानंतर आपल्याला Last Account Acitvity मध्ये जावे लागेल. आता डिटेल्सवर क्लिक करा. आता येथे दिसत असलेल्या Security Checkup क्लिक करा. येथे Your Saved Password दिसेल.


तुमचे Gmail खाते किती वेबसाइट्स आणि अ‍ॅप्सशी लिंक आहे हे इथे तुम्हाला दिसेल. यानंतर तुम्हाला  Go to Password Checkup वर क्लिक करावे लागेल. आणि Gmail Id चा पासवर्ड टाकावा लागेल.


इथे आपल्याला आपल्या Gmail खात्याशी लिंक असलेल्या सर्व अ‍ॅप्स आणि साइटबद्दल माहिती मिळेल. तुम्ही इथल्या साइड पॅनेलवर क्लिक करून लॉग आउट करू शकता.