मुंबई : विज्ञानामुळे तंत्रज्ञानात होत असलेली प्रगती पाहून होणारे आश्चर्य आता नवे राहिले नाही. विज्ञानातील क्रांतीमुळे जगात प्रत्येक मिनीटाला काही ना काही प्रयोगशील घडत असते. त्यामुळे तंत्रज्ञानामुळेच मिळालेली पण, नव्या तंत्रज्ञानामुळे काहीशी जुनी झालेली गोष्ट लगेच कालबाह्य होते. आता DTHचेच पहा ना. टीव्ही दिसण्यासाठी तुमच्या घरी असलेली DTH छत्री सुद्धा आऊटडेटेड होण्याच्या मार्गावर आहे. DTHच्या जागी आता मायक्रो अँटीना येऊ घातला आहे.


नको छत, नको तार, अँटीना झालाय तयार....


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

डीटीएच लावण्यासाठी छत किंवा उंच जागा आवश्यक असते. त्यासाठी नाही म्हटले तरी काहीशी जागाही जाते. पण आता जगभरात मायक्रो स्ट्रीप अँटीनाची चर्चा आहे. भारतातही स्वदेशी मायक्रो स्ट्रीप अँटीनाची निर्मिती करण्यात आली आहे. प्रसारमाध्यमातून आलेल्या माहितीनुसार, स्वदेशी मायक्रो अँटीना पंजाबमधील फतेहगड येथील बाबा बंदा सिंह बहादुर इंजिनिअरिंग कॉलेजमधील इलेक्ट्रॉनिक्स अॅण्ड कम्यूनिकेशन विभागाचे असिस्टंट प्रोफेसर जसपाल सिंह यांनी तयार केला आहे.


सेट अप बॉक्स होणार थेट कनेक्ट


विशेष असे की, हा मायक्रो अँटीनात केवळ दोन ते तीन सेंटीमीटर आकाराच्या चिपचा वापर करण्यात आला आहे. हा चिप असलेला बॉक्स तुमच्या घरातील सर्व्हीस बॉक्सला जोडण्यात येईल. त्यामुळे डिशच्या ऐवजी अॅटीना लाऊनही तुम्हाला टीव्ही स्पष्ट दिसेन.


अँटीना बनविण्यासाठी 5 वर्षे लागली 


दरम्यान, पंजाबमधील फतेहगड येथील बाबा बंदा सिंह बहादुर इंजिनिअरिंग कॉलेजमधील इलेक्ट्रॉनिक्स अॅण्ड कम्यूनिकेशन विभागाचे असिस्टंट प्रोफेसर जसपाल सिंह यांनी सांगितले की, हा अँटीना बनविण्यात यशस्वी होण्यासाठी मला 5 वर्षांचा काळ लागला.


केवळ 50 रूपयांत दिसणार टीव्ही


प्रोफेसर जसपाल सिंह यांनी दावा केला आहे की, हा अँटीना केवळ ग्राहकच नव्हे तर, कंपन्यांनाही फायदेशीर ठरणार आहे. या अँटीनामुळे वेळ आणि पैसा दोन्हीची बचत होणार आहे. त्यासाठी केवळ 50 रूपये खर्च येणार आहे. यासाठी आवश्यक असणारी चिप प्रिंडेड सर्किट बोर्ड (पीसीबी) वर लावण्यात येईल. या चीपचा आकार केवळ दोन सेंटीमिटर ते तीन सेंटीमिटर इतका असणार आहे. या अँटीनाचा वापर केल्यास टीव्हीचे सिग्नल गुणवत्तेतही वाढ होणर असल्याचा दावा जसपाल सिंह यांनी केला आहे.