नवी दिल्ली : वर्षाखेरीस ई-कॉमर्स वेबसाईट अॅमेझॉनने मोठा सेल जाहिर केला आहे. या सेलला अॅमेझॉन EMI फीस्टचे नाव दिले आहे. या सेलमध्ये नो कोस्ट EMI वर स्मार्टफोन, टी.व्ही. आणि होम अप्लायंसच्या अनेक उपकरणांवर बंपर सूट मिळत आहे. विशेष म्हणजे अॅमेझॉन अशा प्रकारच्या उपकरणांच्या खरेदीवर डाऊन पेमेंट आणि प्रोसेसिंग फी घेणार नाही. मात्र यासाठी युजर्संना ६ महिन्यांचा अधिक वेळ दिला जाईल. या ऑफर २ जानेवारीपर्यंतच आहे.


ऑफरची माहिती


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अॅमेझॉनच्या वेबसाईटवर प्रॉडक्टची डिटेल माहिती मिळेल. ज्या प्रॉडक्टला नो कॉस्ट EMI ची ऑफर मिळत आहे, त्या प्रॉडक्टखाली त्याची डिटेल माहिती मिळेल. मात्र त्या प्रॉडक्टखाली  No Cost Emi लिहिलेले असणे गरजेचे आहे. तेव्हाच तिथे ही ऑफर लागू होईल.


फक्त दोन पर्याय


नो कॉस्ट EMI चे फक्त दोन पर्याय आहेत. यात ३ आणि ६ महिन्यांची EMI चे डिटेल्स आहेत. प्रॉड्क्टच्या किंमतीच्या अनुशंगाने EMI असतील. तुमच्या सोयीनुसार तुम्ही हवा तो ऑप्शन निवडू शकता. पर्याय निवडल्यानंतर त्याचे पेमेंट क्रेडिट कार्डने करावे लागेल.


कशावर किती ऑफर ?


अॅमेझॉनच्या या सेलचा सर्वात जास्त फायदा मोबाईल, टी.व्ही. आणि होम अप्लायंसला मिळेल. यात ३१३ रूपयांत फोन, ४९९ रूपयांत टी.व्ही., ४७० रूपयांत स्मॉल अप्लायंस आणि ४७० रूपयांत मोठे अप्लायंस खरेदी करू शकता.



कॅशबॅक ऑफर


अॅमेझॉनच्या या ऑफरचा फायदा उचल्यासाठी तुम्हाला कमीत कमी ७००० रूपयांची शॉपिंग करावी लागेल. यात १५०० रुपयांचे कॅशबॅक मिळेल. म्हणजेच स्वस्त सामानसह ग्राहकांना कॅशबॅकचा फायदा देखील मिळेल. या ऑफरचा फायदा तुम्ही २ मार्चपर्यंत घेऊ शकता.