e-RUPI : भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) शुक्रवारी डिजिटल चलनासाठी संकल्पना नोट जारी केली आहे. यामुळे आता देशातील भारतीय बाजारपेठेत ई-रुपी डिजिटल चलनाच्या प्रवेशाचा मार्ग मोकळा झाला आहे. जगातील डिजिटल चलन म्हणून, क्रिप्टोकरन्सी (Cryptocurrency) बिटकॉइनवर वर्चस्व गाजवत असताना भारतातही आता डिजिटल चलन येत आहे. विशेष म्हणजे क्रिप्टोकरन्सीप्रमाणे याला इंटरनेटची गरज भासणार नाही.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

डिजिटल चलन e-RUPI  हे पूर्णपणे इलेक्ट्रॉनिक व्हाऊचरच्या रूपात असेल, ज्याची कोणतीही प्रिंट आऊट घेऊन जावं लागणार नाही किंवा ई-व्हाऊचरची प्रिंट आऊट कोणालाही दिली जाणार नाही. ई-व्हाऊचरवरून संपूर्ण व्यवहार व्हेरिफिकेशन कोडने केला जाईल. विशेष म्हणजे यामध्ये रोख किंवा कार्डची गरज भासणार नसल्याची माहिती समोर आली आहे.


अलीकडच्या काळात बँकिंग फसवणूक (banking fraud) आणि फसवणुकीच्या वाढत्या घटना लक्षात घेता e-RUPI ही संकल्पना ठेवण्यात आली आहे. जी व्यवहारांमध्ये पूर्णपणे सुरक्षित असेल. या ई-रुपयामुळे आपण नोटांचे सर्व काम करू शकणार आहोत. उलट, पाकिटात ठेवलेल्या नोटांपेक्षा ई-रुपयाचे व्यवहार अधिक जलद आणि सुरक्षित होतील.


ई-रुपी वापरण्याची पद्धत देखील पेटीएम (Paytm) किंवा गुगल पे (Google Pay) सारखी आहे. हे पैसे कोणाच्याही हातात देण्याची गरज नाही, तर त्या व्यक्तीच्या खात्यात डिजिटल पद्धतीने ट्रान्सफर करा. या व्यवहारासाठी वीज किंवा इंटरनेटची आवश्यकता नाही.


आणखी वाचा - Google वर ‘या’ गोष्टी सर्च करता? होऊ शकते जेल; जाणून घ्या माहिती


दरम्यान, ई-रुपी साठी कोणत्याही बँक खात्याची आवश्यकता नाही. बँक खाते असेल तरच UPI वॉलेट किंवा कार्डद्वारे पेमेंट केले जाते परंतु ई-रुपीमध्ये कोणतेही बँक खाते आवश्यक नाही.