Charge Card चा धमाका, एका झटक्यात 100 टक्के चार्ज होतोय मोबाईल
या डिव्हाइसच्या मदतीने अवघ्या काही मिनिटात 100 टक्के चार्जिंग (Charging Card) करु शकता.
मुंबई : घराबाहेर पडल्यानंतर चार्जिंगमुळे मोबाईल (Smartphone Charge) जपून वापरावा लागतो. अनेकदा सोबत चार्जर नसल्याने गैरसोय होते. अशावेळेस दुसऱ्यांकडून चार्जर मागून मोबाईल चार्जिंग (Charger) करावा लागतो. काही जण घराबाहेर असताना चार्जिंगसाठी पावर बँकचा (Power Bank) वापर करतात. मात्र आता पावर बँक आणि चार्जरपेक्षा खतरनाक डिव्हाईस आला आहे. तो डिव्हाइस पाकिटात ठेवूनही अवघ्या काही मिनिटात 100 टक्के चार्जिंग करु शकता. विशेष म्हणजे हा डिव्हाईस सोबत ठेवू शकता. (easily charge your smartphone using charging card know about this new charging device)
या डिव्हाईसचं नाव चार्जिंग कार्ड (Charging Card) असं आहे. हा चार्जिंग कार्ड एटीएम कार्डच्या आकाराचा आहे. खरंतर हे पावर बँकच आहे. पण त्याचा आकार पाहून कुणीही याला चार्जर कार्ड म्हणेल. सध्या या चार्जिंग कार्डची जोरात विक्री होत आहे. सोबत ठेवता येत असल्याने अनेक जण हा चार्जिंग कार्ड खरेदी करत आहेत. या डिव्हाइसचं वजन 10-50 ग्रॅम इतकं आहे. मात्र आकाराने फार लहान असल्याने तुम्ही एटीएम कार्डसोबतही हे चार्जिंग कार्ड ठेवू शकता.
या चार्जिंग कार्डमध्ये 2 हजार 300 एमएच इतक्या पावरची बॅटरी आहे. इमेरजंसीमध्ये या चार्जिंग कार्डच्या मदतीने मोबाईल चार्ज करु शकता. मोबाईल चार्जिंगसाठी सध्या या डिव्हाईसला खूप मागणी आहे. या चार्जिंग कार्डची किंमत 500 रुपयांपासून ते 2 हजार पर्यंत आहे.