मुंबई: एलोन मस्क (Elon Musk) आता जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती नाही, तेही त्याच्या एका फक्त  एका tweet मुळे. बिटकॉइनमध्ये (Bitcoin) गुंतवणूक करून त्यांचे मोठे नुकसान झाले आहे. अलीकडेच अशी बातमी आली की एलोन मस्कने (Elon Musk) बिटकॉइन विकत घेतला आहे, त्यानंतर बिटकॉइनचा विक्रम उच्चांपर्यंत पोहोचला. पण आता बिटकॉइन त्या उंचीवरून घसरला आहे आणि इलोन मस्कलाही भारी नुकसान सहन करावे लागले आहे.

COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एलोन मस्कचं नाव जुळताच बिटकॉइनने 58 हजार डॉलर्सची विक्रम नोंद केली होती, परंतु त्यांच्या एका ट्विटने हा बिटकॉइन परत $50 हजारच्या पातळीवर आला. बिटकॉइन (Bitcoin) आणि इथरच्या (Ether) किंमती जास्त आहेत, असे ते म्हणाले तेव्हा त्या tweet नंतर ही घसरण झाली.

यानंतर सोमवारी टेस्लाच्या शेअर्समध्येही 8.5 टक्क्यांनी घसरण झाली आणि ज्यामध्ये एलन मस्कच्या संपत्तीमधून 15 अब्ज डॉलर पेक्षाही जास्तीचं नुकसान झालं. एलोन मस्क यांनी ट्विटरला आपल्या आवडत्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर सांगितले की टेस्लाने बिटकॉइनमध्ये 150 कोटी डॉलर पेक्षा अधिक पैशाची गुंतवणूक केली आहे.

टेस्लाचे शेअर्स पडल्यामुळे एलन मस्क आता जगातला सर्वात श्रीमंत व्यक्ती राहिलेली नाही आणि त्याचमुळे जेफ बेजोस आता त्याच्या पूर्वपदावर आले आहे. Bloomberg Billionaires Index मध्ये Elon Musk आता दुसऱ्या क्रमांकावर  आले,  त्यांची संपत्ती आता कमी होऊन 183.4 अब्ज डॉलरवर आली आहे. जी याआधी जानेवारीमध्ये 210 अब्ज डॉलर इतकी होती, आणि त्याचमुळे Amazon.com चे मालिक जेफ बेजोस (Jeff Bezos) परत एकदा पहिल्या क्रमांकावर आले आहे.

सध्या त्यांची संपती 3.7 अब्ज डॉलरने कमी झाली आसली तरी आता सध्या ती 186.3 अब्ज डॉलरपर्यंत आहे.

जानेवारीच्या सुरूवातीस, टेस्लाचा शेअर 25% नी वाढला होता, परंतु आता  त्यांनी आता ते संपूर्ण गमावले आहे. एलोन मस्कची रॉकेट कंपनी स्पेसएक्सने (SpaceX)या महिन्याच्या सुरूवातीला 850 मिलियन डॉलरची उलाढाल केली होती, त्याचमुळे कंपनीची Value 74 अब्ज डॉलर्सवर पोहोचली होती, आणि हीच ती वेळ होती जेव्हा एलोन मस्कने जेफ बेझोसला (Jeff Bezos) प्रथम क्रमांकाच्या खुर्चीवरून उतरवून स्वत:ची जागा बनवली होती.