मुंबई : जगातील सर्वांत श्रीमंत व्यक्ती इलॉन मस्क (elon musk) हे टेस्ला (Tesla) या कार कंपनीचे संचालक आहेत. टेस्ला या कार कंपनीत ते नवनवीन प्रयोग करत असतात. नुकताच त्यांनी एक नवीन प्रयोग केला आहे. ज्यामध्ये कार चालकाला आता चावीची गरज भासणार नाही. विना चावी त्यांना कार चालवता येणार आहे. या संबंधित व्हिडिओ देखील कंपनीने जारी केला आहे. हा व्हिडिओ पाहून नागरीकांना या टेक्नॉलॉजीवर विश्वास बसत नाहीए.  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

चावी विना कशी गाडी धावणार?
टेस्ला (Tesla) कंपनीतीलचं वाहन मालक ब्रेंडन डेलाली यांच्या हातावर छोटो ऑपरेशन करण्यात आले. या ऑपरेशनमध्ये डेलाली यांच्या हातात चिप इम्प्लांट लावण्यात आले. हातात चिप प्लांट लावल्यानंतर कारच्या दरवाज्यावर असलेल्या सेन्ससरवर हात फिरतल्यानंतर अनलॉक असलेले दरवाजाचे लॉक उघडते आणि कारचा दरवाजा उघडतो. त्यामुळे आता कार मालकांना चावीची शोधाशोध करावी लागणार नाही. विना चावी कार चालवता येणार आहे. तसेच इतकेच नाही आता वाहनातील इतर गोष्टी देखील हाताच्या इशाऱ्यानेच काम करणार आहे. 


ब्रेंडन डेलाली यांनी ट्विटरवर हा व्हिडिओ शेअर केला आहे. हा व्हिडिओ ट्विट करून त्यांनी लिहिले, "शेवटी मी माझा मुख्य मुद्दा माझ्या हातात घेतला... खरं तर... टेस्ला (Tesla) की लावली, असे ते म्हणाले आहेत. हा व्हिडिओ प्रचंड शेअर होत आहे. 



हा व्हिडिओ पाहून अनेकांनी प्रतिक्रिया दिलीय, "हम्म... हे खूप विचित्र आहे... पण तुमच्या हातात काहीतरी असणे वाईट आहे जे फक्त दरवाजा उघडण्यापेक्षा जास्त करू शकत नाही, असे एका युझरने म्हटलेय. तर दुसऱ्या युझरने "हे तुम्हाला कार स्टार्ट देखील करू देते. त्यामुळे आता तुम्हाला तुमच्या चाव्या किंवा फोन सोबत ठेवण्याची गरज नाही, असे एका युझरने म्हटले आहे. 


दरम्यान टेस्ला (Tesla) कंपनीने आणलेल्या या नवीन तंत्रज्ञानाचे कार मालकांनी स्वागत केले आहे. तसेच या नवीन तंत्रज्ञानाचे खुप कौतूक होत आहे.