वॉशिंग्टन : Facebook changes name : नावात काय, असे विल्यम शेक्सपियर म्हणाला होता. मात्र, आता नावात सर्वकाही आहे, असेच म्हणावे लागेल. समाजमाध्यमांतील आघाडीचा प्लॅटफॉर्म असणारे  facebook ने आपल्या नावात बदल केला आहे. यापुढे फेसबुक आता 'मेटा' (Meta) या नावाने ओळखले जाणार आहे. (Facebook changes its name to Meta in major rebrand) फेसबुकचे जगभरातील अब्जावधी यूजर्स  आता मेटाचे यूजर्स होणार आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

फेसबुकने (facebook) आपले नाव बदलल्याची घोषणा गुरुवारी झालेल्या कंपनीच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत केली. यापुढे फेसबुकला 'मेटा' (meta) या नावाने ओळखले जाणार आहे. फेसबुकचे संस्थापक मार्क झुकरबर्ग यांनी  'मेटा' या नावाची घोषणा केली. ( facebook new name rebrand meta Mark Zuckerberg ) गेल्या अनेक दिवसांपासून फेसबुकचे (facebook ) नाव बदलण्याची चर्चा सुरु होती. गुरुवारी अधिकृतपणे याबाबची घोषणा करण्यात आली. या प्रक्रियेला रिब्रॅण्डिंग असे म्हटले जात आहे. दरम्यान, कंपनी 10 हजार रोजगार देण्याच्याही तयारीत आहे.



फेसबुकने (facebook) रिब्रॅण्डिंगच्या माध्यमाने इन्स्टाग्राम, व्हॉट्सॲप आणि ऑक्युलस अशी ॲप्स एकाच छताखाली येणार आहेत. याबाबत संस्थापक मार्क झुकेरबर्ग यानी अलीकडेच तसे स्पष्ट संकेत दिले होते. दरम्यान, फेसबुकचा वापर जास्त करुन समाजविघातक कामांसाठी होत असल्याचा आरोप अमेरिकेच्या सिनेटमध्ये करण्यात आला होता. अमेरिका सिनेट ग्राहक संरक्षक समितीसमोर फेसबुक कंपनीकडून नागरिकांची सुरक्षा धोक्यात आली आहे. तसेच या प्लॅटफॉर्मचा वापर हिंसाचार परसविण्यासाठी केला जातो, असा पाढाच वाचला गेला. त्यानंतर  फेसबुकचे नाव बदलण्यात आले आहे. यापूर्वी 2015 मध्ये गूगलनेही अल्फाबेट स्थापन करुन कंपनीचा विस्तार केला होता.


मेटाव्हर्स म्हणजे काय? (What is the metaverse?)


फेसबुकने गेल्या महिन्यात प्रथम फेसबुक मेटाव्हर्स (Metaverse) तयार करण्याची आपली योजना उघड केली. मेटाव्हर्स (Metaverse) हा शब्द डिजिटल जगात आभासी, परस्परसंवादी जागेचे वर्णन करण्यासाठी वापरला जातो. मेटाव्हर्स हे खरं तर एक आभासी जग आहे जिथे एखादी व्यक्ती शारीरिकरित्या अस्तित्वात नसली तरीही अस्तित्वात असू शकते. यासाठी आभासी वास्तवाचा वापर केला जातो.


बाहेरील लोकांसाठी, हे आभासी वास्तविकताप्रमाणे (VR) दिसू शकणार आहे. परंतु काही लोकांना वाटते की मेटाव्हर्स इंटरनेटचे भविष्य असू शकते. किंबहुना, असा विश्वास आहे की 1980 च्या दशकातील पहिल्या clunky mobile phonesसाठी आधुनिक स्मार्टफोन काय आहे हे VR साठी (Metaverse) असू शकते.


संगणकावर असण्याऐवजी, मेटाव्हर्समध्ये (Metaverse) तुम्ही सर्व प्रकारच्या डिजिटल वातावरणांना जोडणाऱ्या आभासी जगात प्रवेश करण्यासाठी हेडसेट वापरू शकता. असा त्याचा अर्थ काढण्यात येत आहे. सध्या VR जे मुख्यतः गेमिंगसाठी वापरले जाते. हे आभासी जग व्यावहारिकदृष्ट्या कोणत्याही गोष्टीसाठी वापरले जाऊ शकते, यात काम, खेळ, मैफिल, सिनेमा ट्रिप किंवा फक्त हँग आउट याचा समावेश होतो.