नवी दिल्ली : तुम्ही सोशल मीडिया वापरत असाल आणि त्यातही फेसबुकवर कार्यरत असाल तर, तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. फेसबुकवरील एकूण अकाऊंट्सपैकी तब्बल २० कोटी आकाऊंट्स ही फेक किंवा बनावट आहेत. विशेषत: अशी अकाऊंट्स बनविणाऱ्या देशांमध्ये भारताचा वरचा क्रमांक आहे. फेसबुकनेच ही माहिती दिली आहे.


फेसबुकने जाहीर केला अहवाल


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

फेसबुकनेच जाहीर केलेल्या एका अहवालात म्हटले आहे की, २०१७च्या चैथ्या तिमाहीत असे निदर्शनास आले की, फेक किंवा बनावट (एकाच व्यक्तीची दोन अकाऊंट्स) यूजर्सची संख्या सुमारे १० टक्के इतकी आहे. महत्त्वाचे असे की, भारत, इंडोनेशिया आणि फिलिपाईन्ससारख्या विकसनशील मार्केटमध्ये बनावट अकाऊंट्सची सख्या अधिक आहे.


२०१७ मध्ये वाढली फेक अकाऊंट्स


दरम्यान, ३१ डिसेंबर २०१७ पर्यंत फेसबुकच्या मासिक अॅक्टीव्ह यूजर्सची संख्या २.१३ अरब इतकी होती. जी ३१ डिसेंबर २०१६च्या तूलनेत १४ टक्क्यांनी अधिक आहे. ३१ डिसेंबर २०१६ ला मासिक युजर्सची संख्या १.८६ कोटी इतकी होती. ज्यात ६ टक्के म्हणजेच ११.४ कोटी अकाऊंट्स ही फेक होती. अहवालात असेही म्हटले आहे की, भारत, इंडोनेशिया आणि व्हिएतनाम येथील यूजर्सची वाढ ही २०१६च्या तुलनेत २०१७मध्ये वाढली आहे. बनावट आणि फेक अकाऊंट्सची माहिती ही वास्तव संख्येपेक्षा वेगळी असू शकते असेही फेसबुकने म्हटले आहे.