फेसबुक मेसेंजर क्रॅश होण्यापासून होणार सुटका
नव्या अपडेटमूळे या समस्येचं निराकारण होणार
मुंबई : काही दिवसांपासून फेसबुक मेसेंजर मध्येच बंद पडण्याच्या अडचणी अनेक युजर्सना येत होत्या. गेले दोन दिवस मेसेंजर अॅप उघडल्यानंतर सारखे क्रॅश होतंय. आयफोन आणि आयपॅड युजर्सना ही समस्या सारखी येतेय. फेसबुक मेसेंजरमध्ये ताज्या अपडेटमूळे आयओएस यूजरला होणाऱ्या त्रासातून सुटका होणार आहे. अमेरिकी मीडिया 'द वर्ज' ने दिलेल्या वृत्तानुसार वर्जन १७०.० मध्ये बग होता. कंपनीने अॅपल १७०.१ मध्ये सुधार आणलाय. यूजर आता एप स्टोरमध्ये अपडेट टॅबमध्ये 'मोर' ला टॅब करून वर्जन पाहू शकता.
समस्या सुटणार
मेसेंजर सुरूवातीला चांगले सुरू होते नंतर ते दुसऱ्या अॅपवर जाऊन पुन्हा मेसेंजरवर येतात तेव्हा ते काळे होते. आणि आयफोनच्या होम स्क्रीनला क्रॅश करते असे 'द वर्ज' ने दिलेल्या वृत्तात सांगितले. नव्या अपडेटमूळे या समस्येचं निराकारण होणार असल्याचे फेसबुकने सांगितले.