आता अनोखळी लोकांचे Message होणार ब्लॉक, फेसबुकचं नवीन फीचर
अनेकदा आपण ज्या लोकांना ओळखत नाही त्यांचेही मेसेज आपल्याला सतत येत असतात त्यासाठी फेसबुकनं खास फीचर आणलं आहे.
मुंबई: अनेकदा आपण ज्या लोकांना ओळखत नाही त्यांचेही मेसेज आपल्याला सतत येत असतात. अशा व्यक्तींना ब्लॉक करण्यावाचून आपल्याकडे पर्याय नसतो. पण आपल्याला नको असेल तरीदेखील असे मेसेज येणं बंद होत नाही. त्यामुळे अनेक युझर्स हैराण झाले आहेत. अशा युझर्सच्या समस्या लक्षात घेऊन फेसबुकनं आता नवीन फीचर आणलं आहे.
अनोळखी लोकांचे मेसेज सहज ब्लॉक किंवा डिलीट करेल असं एक फीचर लवकरच फेसबुक आणणार आहे. तुम्हाला अनोळखी व्यक्तींचे मेसेज नको असतील तर या फीचरच्या मदतीनं आपण अगदी सहजपणे डिलीट किंवा ब्लॉक करू शकता. या फीचरमध्ये एकाचवेळी अनेक मेसेज हटवण्याची देखील सुविधा देण्यात आली आहे.
सुरक्षेच्या दृष्टीनं फेसबुकनं हे फीचर आणलं आहे. याशिवाय पॉप-अप फिशिंग सूचना आणि अज्ञात वापरकर्त्यांकडून मेसेज पाहू नये यासाठी फेसबुकने यापूर्वीच ऑटोमॅटिक इमेज ब्लरिंग टूल फीचर आणलं होतं. मोठ्या संख्येने मेसेजे आणि फ्रेंड रिक्वेस्ट
पाठवणाऱ्या लोकांवर फेसबुक लक्ष ठेवून आहे.
याआधी इन्टाग्रामवर मेसेज पाठवण्यासंदर्भात अनेक गोष्टी समोर आल्या होता. तसच सध्या मोठ्या प्रमाणात फेसबुक आणि इन्स्टाग्राम अकाऊंट्स हॅक करून किंवा फेक अकाऊंट सुरू करून मदत मागून फसवणूक करण्याचं प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढलं आहे. त्यामुळे फेसबुक सुरक्षेसाठी अनेक नवनवीन फीचर्स आणत आहे. या फीचर्सचा य़ुझर्सना नक्की फायदा होणार आहे.
तुम्हालाही जर अशा रिक्वेस्ट किंवा अनोळखी मेसेज येत असतील तर या फीचरचा तुम्ही उपयोग आपल्या फोनमध्ये करू शकता. फेसबुकनं आता आपल्या नवीन अॅपमध्ये बदल केले आहेत. सुरक्षेच्या दृष्टीनं आणखीन फीचर्सवर फेसबुकचं काम करणं सुरू आहे.