Who has Seen My Facebook Profile: Facebook आजच्या काळात फेसबुक हे सर्वात लोकप्रिय सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आहे. जरी फेसबुकवर, आपण ज्या लोकांना ओळखतो त्याच लोकांशी कनेक्ट होतो, परंतु बरेच अनोळखी लोक देखील अ‍ॅपवर फ्रेन्ड रिक्वेस्ट पाठवतात. तुम्ही त्यांची रिक्वेस्ट स्वीकारली नसली तरीही ते तुमचे प्रोफाइल पाहू शकतात. आज आम्ही तुम्हाला अशाच एका ट्रिकबद्दल सांगणार आहोत, ज्याद्वारे तुम्ही तुमचे प्रोफाईल कोणी चेक केले आहे हे तपासू शकता...


अशा प्रकारे माहिती कळेल 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तुमच्या माहितीसाठी आम्ही तुम्हाला सांगतो की, तुम्ही तुमच्या स्मार्टफोनवर फेसबुक वापरत आहात की नाही, तुमची प्रोफाइल कोणी पाहिली आहे, हे तपासण्यासाठी तुम्हाला डेस्कटॉप किंवा लॅपटॉप वापरावा लागेल. ही युक्ती तुम्ही मोबाईलवर वापरु शकत नाही. तुम्हाला जाणून घेण्याची उत्सुकता असेल तर लगेच तुमचा लॅटपॉट आणि डेस्कटॉप उघडा आणि या काही स्टेप्स फॉलो करा. 


या Steps चे अनुसरण करा


सर्वप्रथम, तुम्हाला तुमच्या लॅपटॉप किंवा डेस्कटॉपवर ब्राउझर उघडावे लागेल आणि त्यामध्ये तुमच्या Facebook खात्यात लॉग-इन करावे लागेल. खात्यात लॉग इन केल्यानंतर, तुम्हाला तुमच्या प्रोफाइलवर जावे लागेल आणि नंतर त्यावर उजव्या बाजुला क्लिक करावे लागेल. तेथे तुम्हाला अनेक पर्याय दिसतील, त्यापैकी तुम्हाला 'पेज सोर्स पाहा' वर जावे लागेल. आम्ही तुम्हाला सांगतो की तुम्ही 'पेज सोर्स पाहा' वर जाण्यासाठी CTRL + U कमांड देखील वापरु शकता. आता यानंतर, CTRL+F कमांड द्या आणि नंतर BUDDY_ID शोधा.


त्याच्या समोर 15 अंक असतील, तुम्हाला ते कॉपी करावे लागतील आणि त्यानंतर तुम्हाला ते अंक https://www.facebook.com/15 मध्ये टाकावे लागतील .  तुमच्यासमोर यादी येईल आणि नावांचा उलगडा होईल. करा मग चेक पटापट.