मुंबई : तरुणांमध्ये वाढते आत्महत्यांचे प्रमाण पाहता फेसबुकने याबाबतीत पाऊल उचलले आहे. तरुणाईमधील आत्महत्यांचे प्रमाण रोखण्यासाठी गेल्या अधिक काळापासून एका सॉफ्टवेअरवर काम करतेय. या सॉफ्टवेअरद्वारे कंपनी आत्महत्येबाबतच्या पोस्टला स्कॅन करतील तसेच त्यावर नजर ठेवण्यात येईल. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मंगळवारी फेसबुकने अधिकृत पोस्ट टाकत याबाबत माहिती दिली. आर्टिफिशियल इंटेलिदजेंसवर आधारित या सॉफ्टवेअरचे अमेरिकेत यशस्वी टेस्टिंग करण्यात आलाये. 



एखादा यूझर्स लाईव्हदरम्यान आत्महत्येचा विचार करत असेल कर तुमचे मनसुबे ओळखून याबाबतचा धोक्याचा इशारा तुमच्या कुटुंबीय तसेच मित्रांना मिळेल. फेसबुकचा संस्थापक मार्क झुकरबर्गने या वर्षी मार्चमध्ये या फीचरबाबत माहिती दिली होती.