iPhone Fake Check : बाजारात आला फेक आयफोन, तुमच्या हातातील आयफोन बोगस तर नाही? असं करा चेक...
iphone Fake Check : तुमच्या हातातील आयफोन खरा आहे की फर्स्ट कॉपी? बातमीतील व्हिडीओ पाहा आणि आयफोन चेक करा
First Copy Vs Orignal iPhone : आपल्याही हातात एक आयफोन असावा असं अनेकांना वाटतं. हातातील आयफोन म्हणजे एक स्टेस्टस सिम्बॉल ( Status Symbol ) झाला आहे असं म्हंटलं तर वावगं ठरणार नाही. केवळ भारतातच नाही तर जगभरात हा ट्रेंड पाहायला मिळतो. भारतात केवळ आपल्या हातात आयफोन आहे हे दाखवण्यासाठी कोणत्याही फोनच्या मागे ऍपल कंपनीचा लोगो देखील लावून मिळतो. अतिशय कमी किमतीत तुम्ही हुबेहूब डुप्लिकेट आयफोन ( First Copy iPhone) विकत घेवू शकतात. पण हे केवळ भारतातच पाहायला मिळत नाही तर परदेशातही असे प्रकार सर्रास पाहायला मिळतात. अशात तुमची मोठी फसवणूक होऊ शकते. म्हणूनच YouTube वर मोठ्या प्रमाणात व्हायरल झालेला हा व्हिडीओ पहायलाच हवा.
तुमच्या हातातील आयफोन खरा की खोटा?
तुम्ही जर खूप पैसे मोजून आयफोन घेतला असेल आणि तो डुप्लिकेट निघाला ( Is your iphone duplicate ) तर? अशात तुम्ही घेतलेला आयफोन खरा की खोटा हे कसं ओळखायचं हे जाणून घेऊया. Custom Adventurist नावाच्या Youtube चॅनलवर याबाबतचा एक व्हिडीओ अपलोड करण्यात आला आहे. त्यामध्ये तुम्हाला दोन बॉक्स पाहायला मिळतील. यापैकी एक बॉक्समध्ये खरा, तर एक बॉक्समध्ये डुप्लिकेट किंवा फर्स्ट कॉपी आयफोन आहे. सुरवातीला दिसायला दोन्ही आयफोन सारखे पाहायला मिळतात. मात्र हळू हळू आपल्याला कोणता खरा, कोणता खोटा याबाबत उलगडा होतो.
किमतीत मोठी तफावत..
या व्हिडिओमधील फर्स्ट कॉपी आयफोनची किंमत अवघे 100 ते 150 अमेरिकन डॉलर्स आहे एवढी आहे. तर तोच खरा, ओरिजनल आयफोन तब्बल 1500 अमेरिकन डॉलर्सला आहे.
डिसप्ले आणि कॅमेरा
दोन्ही फोनच्या डिसप्ले क्वालिटीत फरक पाहायला मिळतो. ओरिजनल आयफोनचा डिसप्ले अधिक शार्प आणि रंग अधिक उठून दिसतात ( iPhone display and camera ). तेच फर्स्ट कॉपी फोनमध्ये रंग तेवढे उठून दिसत नाहीत. याठिकाणी व्हिडीओ क्वालिटी दाखवण्यासाठी या यू ट्युबर ने दोन्ही फोनमध्ये एकाच व्हिडीओ देखील चालवून दाखवला. यामध्येही फोनच्या डिसप्ले आणि आवाजात फरक स्पष्ट जाणवतो. सोबतच फर्स्ट कॉपी फोनचा कॅमेरा ( iphone camera quality) देखील कमी प्रतीचा पायाला मिळतो. कॅमेरा सोबतचा फ्लॅश लाईट हा देखील फर्स्ट कॉपी फोनमध्ये कमकुवत असल्याचं स्पष्ट दिसतं .
पाहा हा संपूर्ण व्हिडीओ :
फेस अनलॉक फिचर
दोन्ही फोनच्या सेटिंगमध्ये गेल्यास फेस अनलॉक हे फिचर ( Iphone Face Unlock Feature) पाहायला तर मिळतं. मात्र फर्स्ट कॉपीमधील फेस डिटेक्शन हे फिचर चालताच नाही.
तुमचा आयफोन फर्स्ट कॉपी आहे की ओरिजनल?
तुम्ही संपूर्ण व्हिडीओ पाहिल्यावर तुमचा आयफोन तपासून घ्या. या डेमोमध्ये दाखवल्याप्रमाणे तुम्हीही तुमच्या आयफोनचं टेस्टींग करू शकतात. यामध्ये फोनचा लूक, फील आणि एकंदर सर्व फीचर्स बारकाईने पाहिल्यास तुमचा फोने खरा की खोटा हे समजू शकेल.
fake iphone in market this is how you should check your mobile is real or fake