Alert:फक्त यूट्यूबवरील व्हिडीओ लाईक करा आणि पैसे कमवा! असा मेसेज WhatsApp आला असेल तर...
WhatsApp Scam Fake Job Trick: सध्या तंत्रज्ञानाचं युग असून जगाचा चेहरामोहरा गेल्या काही वर्षात वेगाने बदलला आहे. सोशल मीडियामुळे तर जग एकमेकांजवळ आलं आहे. मात्र असं असलं तरी या माध्यमांचा वापर करून अनेकांची फसवणूक देखील होत आहे.
WhatsApp Scam Fake Job Trick: सध्या तंत्रज्ञानाचं युग असून जगाचा चेहरामोहरा गेल्या काही वर्षात वेगाने बदलला आहे. सोशल मीडियामुळे तर जग एकमेकांजवळ आलं आहे. मात्र असं असलं तरी या माध्यमांचा वापर करून अनेकांची फसवणूक देखील होत आहे. फसवणुकीचे असे अनेक प्रकार समोर आले आहेत. कदाचित तुम्हालाही असा फटका बसला असेल. त्यामुळे सोशल मीडियाच्या जगात वावरताना काळजी घेणं आवश्यक आहे. नुकताच सोशल मीडियावर फसवणुकीचा नवा प्रकार समोर आला आहे. यासाठी व्हॉट्सअॅप, लिंकडीन आणि फेसबुकवरील युजर्संना आपल्या जाळ्यात ओढलं जात आहे. खासकरून बेरोजगार तरुणांना घरबसल्या नोकरीचं आमिष दाखवून फसवणूक केली जात आहे. असाच एक मेसेच सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. हा मेसेच वाचल्यावर कुणालाही अशी नोकरी आपल्याकडे असावी वाटतं.
एका वेबसाईटनं दिलेल्या माहितीनुसार, अनेक जण फसवणूक करणाऱ्या जाहिरातील भुलून नोकरीचं स्वरुप काय असेल, याबाबत विचारणा करतात. मर्यादित जागा असल्याचा मेसेज वाचून अनेक जण लगेचच संपर्क साधतात. सावज आपल्या जाळ्यात आल्याचं ओळखून युट्यूबवरील व्हिडीओ फक्त लाईक करायचे आणि पैसे कमवायचे. तसेच प्रत्येक व्हिडीओ लाईकमागे 50 रुपये मिळतील असंही सांगितलं जातं. तसेच दिवसाला जास्तीत जास्त 5000 रुपये मिळतील, असं आमिष दिलं जातं.
बातमी वाचा- तुम्ही Truecaller वापरता का? मग ही बातमी वाचाच!
सुरुवातीला आपला विश्वास बसावा यासाठी खात्यात काही तुटपुंजी रक्कम पाठवली जाते. एकदा का विश्वास बसला की मग त्यांचा खेळ सुरु होतो. पैसे ट्रान्सफर करण्यास अडचण येत असल्याचं सांगून अॅप डाउनलोड करण्यास सांगितलं जातं. मात्र एकदा का ते अॅप डाउनलोड केलं की, त्या माध्यमातून तुमची आर्थिक, वैयक्तिक माहितीवर डल्ला मारला जातो. इतकंच काय तर पासवर्ड, ओटीपी आणि ईमेलचा त्यांना अक्सेस मिळतो. त्यानंतर या माहितीच्या आधारे लाखोंचा गंडा घातला जातो.
बातमी वाचा- Netflix: मित्रांबरोबर Netflix Password शेअर करणं 'महागात' पडणार; कंपनीचा नवा नियम
सोशल मीडियावरील फेक जाहीरतींना भुलू नका असा सल्ला सोशल मीडिया तज्ज्ञांनी दिला आहे. कोणतीही लिंक क्लिक करण्यापूर्वी दहावेळा विचार करा. कारण अशा पद्धतीने पैसे देणारे भविष्यात तुम्हाला मोठा दणका देणार असल्याचं समजून जा.