मुंबई : गूगल सर्च करताना नेहमी, स्लो इंटरनेट स्पीडचा सामना करावा लागतो, मात्र आता या समस्येपासून मुक्ती मिळण्याची शक्यता आहे. कंपनी लवकरच गूगलचं लाईट वर्जन बाजारात आणणार आहे.


गूगलचं लाईट वर्जनचे फीचर


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हे लाईट वर्जन अगदी गूगल सर्चिंग अॅपप्रमाणेच काम करणार आहे. गूगल लाईट वर्जनमध्येही टाईप करून आणि बोलून सर्च करण्याचा ऑप्शन असेल. 


मीडिया रिपोर्टसनुसार मागील अॅपच्या तुलनेत लाईट वर्जन कमी डाटा वापरणार आहे, तसेच लो बॅडविथलाही काम करणार आहे, या सोबत सामान्य अँड्रॉईड फीचर फोन सारखेच गूगलचे सारे सर्च टूल असतील.


नेटस्पीड कमी पण सर्च वेगात


नेटस्पीड कमी असला तरीही वेगात सर्च होण्यासाठी हा ऑप्शन वापरण्यात येणार आहे. या आधी गूगलने यूट्यूबच्या लाईट वर्जनची टेस्ट केली आहे. ज्यात कमी स्पीडमध्येही सर्व सेवांचा लाभ मिळू शकतो.