मुंबई : अवघ्या काही दिवसांमध्ये २०१७ हे वर्ष संपणार आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अनेक चांगल्या वाईट घटनांनी हे वर्ष सजलेलं आहे. त्यामुळे तुम्हांला नक्कीच हे वर्ष लक्षात राहणार आहे. गूगल आणि इंटरनेटशिवाय आजकाल कोणाचाच दिवस संपत नाही. मग तुम्हांला ठाऊक आहे का ? यंदाच्या वर्षी कोणता शब्द सर्वाधिक वेळेस सर्च केला आहे ? 


मेरियम वेबस्टरने जाहिर केली यादी  


२०१७ हे वर्ष 'स्त्रिया'साठी खास ठरले आहे. यंदा 'फेमिनिजम' हा शब्द सर्वाधिक सर्च झाला आहे. यंदा 'मी टू' या मोहिमेने जगभरात प्रसिद्धी मिळवली. हॉलिवूडमधून लैंगिक अत्याचाराविरूद्धच्या मोहिमेला सुरूवात झाली.  


जात, धर्म, भाषा यांच्या पलिकडे जाऊन अनेक स्त्रिया एकवटल्या. हॉलिवूडच्या अनेक अभिनेत्रींनी 'फेमिनिझम' बाबत आपली मतं व्यक्त केली. त्यामुळे जगभरात या शब्दाचा अर्थ शोधण्यासाठी चळवळ सुरू झाली आहे.  


कोणत्या शब्दाची चर्चा अधिक ? 


फेमिनिजम पाठोपाठ 'कॉम्प्लिसिट' ,'डोटड' ,'जायरो'.'इम्पथी' हे शब्द सर्च केले गेले. किम जॉंग उन  या कोरियाच्या हुकुमशहाने 'डोटड' हा शब्द डोनाल्ड ट्रम्पसाठी वापरला होता. त्यामुळे 'डोटड' या शब्दाबाबत लोकांच्या मनात खूपच उत्सुकता आहे. 'डोटड' चा अर्थ वाढत्या वयासोबत मानसिक संतुलन ढासळत गेलेली व्यक्ती असा होतो.