Tips And Tricks: WhatsApp वर तुम्हाला कोणी ब्लॉक केलंय, या सोप्या ट्रिकने शोधा
जर तुम्हाला कोणाशी बोलायचे नसेल आणि तर तुम्ही त्याला व्हॉट्सअॅपवर ब्लॉक करू शकता. पण जर तुम्हाला कोणी ब्लॉक केलं असेल तर सोप्या ट्रिकने शोधू शकता.
WhatsApp Tips And Tricks: व्हॉट्सअॅप सर्वाधिक वापरलं जाणार मेसेजिंग अॅप असून लोकप्रिय आहे. तुमच्या स्मार्टफोनमध्ये व्हॉट्सअॅप (WhatsApp) असेलच. व्हॉट्सअॅप आपल्या युजर्संना विविध फीचर देते, त्यापैकी एक लोकप्रिय फीचर्स म्हणजे एखाद्याला ब्लॉक करणे. जर तुम्हाला कोणाशीही बोलायचे नसेल आणि तर तुम्ही त्याला ब्लॉक करू शकता. पण जर तुम्हाला कोणी ब्लॉक केलं असेल तर सोप्या ट्रिकने शोधू शकता. व्हॉट्सअॅप FAQ पेजनुसार, असे काही इंडिकेटर्स आहेत ज्याद्वारे तुम्हाला व्हॉट्सअॅपवर कोणी ब्लॉक केले आहे याबाबत कळू शकतं.
या सोप्या ट्रिकने जाणून घ्या तुम्हाला कोणी ब्लॉक केलं?
-जर तुम्हाला कोणी ब्लॉक केलं असेल तर चॅट विंडोमध्ये कॉन्टॅक्टचं लास्ट सीन, ऑनलाइन स्टेटस दिसत नाही.
-संबंधित व्यक्तीचा प्रोफाईल फोटो दिसत नसेल तर समजून त्या व्यक्तींने तुम्हाला ब्लॉक केलं आहे.
-मेसेज पाठवल्यानंतर फक्त सिंगल चेक मार्क येतं. तसेच खूप वेळानंतरही डबल मार्क आलं नाही तर ब्लॉक केलं असं समजून जा.
-तुम्हाला ब्लॉक केलं असेल तर त्या व्यक्तीला तुम्ही व्हिडीओ किंवा ऑडीओ कॉल करू शकत नाही.
तुम्हीही इतरांना ब्लॉक करू शकता, कसं ते जाणून घ्या
पहिल्यांदा कॉन्टॅक्ट चॅटमध्ये जा
त्या व्यक्तीचं प्रोफाईल ओपन करा
टॉप बार वर क्लिक करा. म्हणजेच नाव दिसतंय त्यावर क्लिक करा.
स्क्रोल करून खाली या आणि ब्लॉक ऑप्शनवर क्लिक करा