Fingerprints Scam : इंटरनेटवर अनेक प्रकारचे स्कॅम होत असतात. कोणी माजी सैनिक असल्याचे सांगून फोन करतो, तर कोणी काहीतरी बहाण्याने ओटीपी मागतो. पण तुमचे आधार कार्ड वापरून लोक तुमचे फिंगरप्रिंट देखील चोरू शकतात, याबद्दल तुम्हाला माहिती आहे का? हे झाल्यानंतर कोणत्याही ओटीपीशिवायही तुमच्या बँकेतून पैसे काढले जाऊ शकतात. सध्या मार्केटमध्ये सुरु धुमाकूळ घातलेल्या फिंगरप्रिंट स्कॅमबद्दल जाणून घेऊया.


फिंगरप्रिंट स्कॅम म्हणजे काय?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सर्वप्रथम फिंगरप्रिंट स्कॅम म्हणजे काय ते समजून घेऊया. स्कॅम करणारे भुरटे तुमचे बायोमेट्रिक्स आधार कार्डमधून चोरतात. यानंतर ते तुमच्या बँक खात्याची माहिती घेतात आणि नंतर संपूर्ण रक्कम काढतात. हे टाळण्यासाठी तुम्हाला तुमचे बायोमेट्रिक्स लॉक करावे लागतील. असे केल्यास फसवणूक करणारे तुमची माहिती मिळवू शकणार नाहीत.


फिंगरप्रिंट स्कॅम टाळण्याच्या स्टेप 


फिंगरप्रिंट घोटाळा टाळण्यासाठी, तुम्हाला तुमचा आधार क्रमांक टाकून आधार कार्डच्या मुख्य वेबसाइटवर लॉग इन करा.


यानंतर तुम्हाला My Aadhaar पर्यायावर क्लिक करा.


आता तुम्हाला बायोमेट्रिक लॉक नावाचा पर्याय दिसेल.


 यावर क्लिक केल्यानंतर कोणताही फसवणूक करणारा तुमची माहिती वापरू शकणार नाही. 
 
याच्या व्हेरिफिकेशनसाठी तुमच्या फोनमध्ये एक OTP देखील येईल. तुम्हाला तो प्रविष्ट करून स्वतःची पडताळणी करावी लागेल.


सावध राहणे गरजेचे 


सध्या दररोज नवा घोटाळा समोर येत आहे. त्यामुळे काळजीच्या दृष्टीकोनाने तुम्ही तुमचे बँक स्टेटमेंट सतत तपासले पाहिजे. तसेच कोणत्याही प्रकारच्या मेसेज किंवा कॉलवर विश्वास ठेवू नका.


बँकेला फोनशी लिंक करा


तुम्ही वापरत असलेल्या फोन नंबरशी तुमचे बँक खाते लिंक केल्यास तुम्हाला सर्व माहिती आणि अपडेट मेसेजद्वारे मिळत राहतील. फसवणूक करणाऱ्यांपासून दूर राहण्याचा हा सर्वात सोपा मार्ग आहे.