Flipkart Big Saving Days Sale: कमी किंमतीत चांगला मोबाईल घेण्याच्या तयारीत असाल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. एकीकडे पावसाची संततधार सुरु असतनाना फ्लिपकार्टवरदेखील ऑफर्सचा पाऊस पडतोय. त्यामुळे नव नव्या वस्तू घेण्यासाठी फ्लिपकार्टच्या सेलची वाट पाहणाऱ्यांना चांगला फायदा घेता येतोय. फ्लिपकार्ट बिग सेव्हिंग डेज सेल सुरू झाला आहे. या सेलमध्ये अनेक स्मार्टफोन्सवर आकर्षक डिस्काउंट मिळत आहेत. येथून तुम्ही अनेक स्मार्टफोन स्वस्तात खरेदी करू शकता. फ्लिपकार्ट सेलमध्ये तुम्ही स्मार्टफोनसोबतच टीव्ही, फ्रीज आणि इतर इलेक्ट्रॉनिक उत्पादनांवरही आकर्षक सूट मिळवू शकणार आहात. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

15 जुलैपासून सुरू झालेला फ्लिपकार्ट सेल 19 जुलैपर्यंत चालणार आहे. यामध्ये तुम्हाला गुगल पिक्सल 7 प्रो वर एक आकर्षक ऑफर मिळत आहे. येथून तुम्ही हा स्मार्टफोन अनेक हजारांच्या सवलतीमध्ये खरेदी करू शकता. या फोनमध्ये गुगलचा टेंसर जी 2 चिपसेट, अपडेटेड Android OS, 4926mAh बॅटरी यांसारखी वैशिष्ट्ये आहेत. त्याचे तपशील जाणून घेऊया.


'गुगल पिक्सल 7 प्रो'वर काय ऑफर?


कंपनीने हा फोन 84,999 रुपये किमतीत लॉन्च केला आहे. ही किंमत फोनच्या सिंगल कॉन्फिगरेशन 12जीबी रॅम + 128जीबी स्टोरेज वेरिएंटची आहे. तुम्ही हा फोन ऑब्सिडियन, स्नो आणि हेजल या तीन आकर्षत रंगांमध्ये खरेदी करु शकता. हा फोन फ्लिपकार्ट बिग सेव्हिंग डेज सेलमध्ये ६७,९९९ रुपयांना उपलब्ध आहे.


HDFC बँक क्रेडिट कार्ड EMI ट्रान्झाक्शन केल्यास स्मार्टफोनवर तुम्हाला 4000 रुपयांची थेट सूट मिळणार आहे. नॉर्मल ट्रान्झाक्शनवर 2000 रुपयांची सूट उपलब्ध आहे. यानंतर फोनची किंमत 63,999 रुपये होईल. फ्लिपकार्टकडून Axis Bank क्रेडिट कार्डवर 1500 रुपयांची सूट देखील देण्यात आली आहे.


गुगल पिक्सल 7 pro चे फिचर्स


Google Pixel 7 Pro हा हाय-एंड स्मार्टफोन आहे. यात 6.7-इंचाचा OLED LTPO डिस्प्ले आहे. फोनमध्ये Tensor G2 चिपसेट देण्यात आला आहे. यात 12GB रॅम आणि 128GB स्टोरेज आहे. फोनमध्ये 50MP + 48MP + 12MP चा ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप उपलब्ध आहे.


याशिवाय कंपनीने फ्रंटमध्ये 10.8MP सेल्फी कॅमेरा दिला आहे. डिव्हाइसला पॉवर करण्यासाठी, 4926mAh बॅटरी देण्यात आली आहे. यामध्ये तुम्हाला वायरलेस चार्जिंग, इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर सारखे फीचर्स देखील मिळतात. फोन IP68 रेटिंगसह येतो.


या किंमतीत तुम्हाला क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 8 Gen 2 प्रोसेसर किंवा Apple चा A15 Bionic प्रोसेसर असलेले फोन मिळतात. हे फोन परफॉर्मन्सच्या बाबतीत Pixel 7 Pro वर भारी असतील. पण या गुगल फोनमध्ये तुम्हाला उत्तम सॉफ्टवेअर आणि उत्तम कॅमेरा अनुभवता येणार आहे. परफॉर्मन्स हा तुमचा मुख्य फोकस नसल्यास, हा स्मार्टफोन तुमच्यासाठी सर्वोत्तम पर्याय असेल.