मुंबई : देशातील सर्वात मोठी ऑनलाइन रिटेल कंपनी फ्लिपकार्टने बुधवारी महत्वाची घोषणा केली आहे. आता फ्लिपकार्ट जुन्या सामानाला नवं करून विकणार आहे. यासाठी त्यांनी एक वेबसाइट लाँच केली आहे. ज्याचं नाव आहे 'टू गूड' (2GUD) सुरूवातीला या वेबसाइटवर जुनं इलेक्ट्रिक सामान विकलं जाणार आहे. ज्यासोबत कंपनी गुणवत्तेचं सर्टिफिकेट देखील देणार आहे. यातील वस्तू या कमी दरात दिल्या जाणार आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या स्टोरमध्ये आता जुने मोबाइल फोन, लॅपटॉप, स्मार्ट वॉच आणि टॅबलेट सारख्या गोष्टी उपलब्ध आहेत. कंपनीने सांगितलं आहे की, येणाऱ्या काही दिवसांत फ्लिपकार्टच्या या नव्या स्टोरमध्ये स्पीकर, पावर बँक, हेअर ड्रायर, हेअर स्ट्रेटनर, टीव्ही सेट आणि त्यासारखे 400 हून अधिक प्रोडक्ट उपलब्ध होणार आहे. 



छोट्या शहरांकडून आशा 


असं म्हटलं जातं आहे की, या नव्या वेबसाइटवर वस्तून 80 टक्के स्वस्त दरात मिळणार आहे. या नव्या संकेतस्थळाला छोट्या शहरांकडून अधिक आशा आहेत. त्यांच्याकडून उत्तम प्रतिसाद मिळेल असा त्यांचा विचार आहे. ज्या शहरात लोकांची नवीन वस्तू खरेदी करण्याची ताकद नाही मात्र त्यांना याचा वापर करायचा आहे त्यांच्यासाठी ही सुवर्णसंधी आहे.