`फ्लिपकार्ट`चा मोबाईल बोनान्झा सेल सुरू, वाट कसली पाहताय...
एसबीआय क्रेडीट कार्ड वापरलं तर पेमेंटमध्ये तुम्हाला १० टक्क्यांचा इन्स्टंट डिस्काऊंट मिळेल
मुंबई : तुम्ही नवीन स्मार्टफोन विकत घेण्यासाठी योग्य संधीची वाट पाहत असाल तर तुमच्यासाठी खुशखबर आहे... 'फ्लिपकार्ट'चा मोबाईल बोनान्झा सेल आजपासून २६ डिसेंबरपासून सुरू झालाय. २९ डिसेंबरपर्यंत हा सेल सुरू राहील. यामध्ये मोबाईलवर ग्राहकांना डिस्काऊंट तर मिळेलच पण त्यासोबतच नो कॉस्ट ईएमआय, एक्स्ट्रा एक्स्चेंज व्हॅल्यू आणि बायबॅक गॅरंटी यांसारखे ऑफर्सही मिळतील.
या सेलसाठी कंपनीनं एसबीआय बँकेसोबत हातमिळवणी केलीय. यामुळे तुम्ही जर एसबीआय क्रेडीट कार्ड वापरलं तर पेमेंटमध्ये तुम्हाला १० टक्क्यांचा इन्स्टंट डिस्काऊंट मिळेल.
या सेलमध्ये ग्राहकांना नोकिया ६.१ प्लस, रिअलमी २ प्रोच्या सर्व फोन्सवर तुम्हाला १००० रुपयांचा डिस्काऊंट मिळणार आहे. एसबीआय क्रेडीटकार्ड वापरलंत तर आणखीन १५०० रुपयांपर्यंतचा डिस्काऊंट तुम्ही मिळवू शकाल.
गुगलच्या पिक्सल २ एक्सएल स्मार्टफोनवर कंपनी ५,५०० रुपयांची सूट देतेय. या स्मार्टफोनची मूळ किंमत ४५,४९९ रुपये आहे. सेलमध्ये हाच फोन तुम्हाला ३९,९९९ रुपयांत उपलब्ध होईल. हा फोन ४ जीबी रॅम आणि ६४ जीबी मेमरीच्या व्हेरियंटमध्ये उपलब्ध आहे. यात स्नॅपड्रॅगन ८३५ प्रोसेसर, ३५२० एमएएचची बॅटरी देण्यात आलीय.
याशिवाय, अनेक स्मार्टफोन्सवर आकर्षक सूटही मिळत आहे. ओप्पो के एफ ९ प्रो, ए ३ एस, एफ ९, वीवो वी११, वीवो ११ प्रो, वीवो वाई ८३ आणि वीवो वी९ यूथ वरही सेलमध्ये अतिरिक्त एक्सचेंज व्हॅल्यू ऑफर मिळतेय.