IPhone 11 : 44 हजारांचा आयफोन 11 मिळतोय फक्त 18 हजार रुपयांमध्ये
iPhone 11 खरेदी केल्यास तुम्हाला अनेक बँक ऑफर्सचा लाभही मिळू शकतो.
मुंबई : स्मार्टफोन घेण्याचा विचारात असाल तर ही योग्य वेळ आहे. कारण स्मार्टफोनवर (Smartphone) बंपर डिस्काउंट (Discount) सुरु आहे. आता तुम्ही 35 हजारांपेक्षा कमी किमतीत iPhone 11 खरेदी करू शकता. तुम्ही म्हणाल काय थट्टा लावलीय, पण हो हे खरं आहे. आयफोन 11 (iPhone 11) च्या किमतीत अचानक घट झाली आहे. (flipkart the big billion days sale buy 44 thousand iPhone 11 for 18 thousand)
फिल्पकार्ट द बिग बिलियन डेज सेल (Flipkart The Big Billion Days Sale) सुरु होतोय.या सेलच्या माध्यमातून आयफोन 11 35 हजारांपेक्षा कमी किमतीत खरेदी करू शकता. आयफोन 11 ची किंमत ही 43 हजार 900 रुपये इतकी झाली आहे. मात्र तुम्ही आयफोन 11 केवळ 34 हजार 990 रुपयांमध्ये सवलतीच्या दरात खरेदी करु शकता.
iPhone 11 साठी बँक ऑफर्स
iPhone 11 खरेदी केल्यास तुम्हाला अनेक बँक ऑफर्सचा लाभही मिळू शकतो. Axis Bank क्रेडिट कार्डने पेमेंट केल्यावर तुम्हाला 10% कॅशबॅक देखील मिळू शकतो. मात्र एक अट आहे. यासाठी तुम्हाला 5 हजार रुपयांची खरेदी करावी लागणार आहे. यानंतर तुम्हाला 1 हजार 500 रुपयांपर्यंत सूट मिळू शकते. ICICI बँक क्रेडिट कार्डने पेमेंट केल्यावर तुम्हाला 10% पर्यंत सूट मिळू शकते. अशीच ऑफर Flipkart Axis Bank क्रेडिट कार्डवर चालू आहे.
iPhone 11 मध्ये खास काय?
एक्सचेंज ऑफरमध्ये (Exchange Offer) तुम्हाला वेगळी सूट मिळू शकते. तुमचा जुना मोबाईल चांगल्या स्थितीत असेल, तर 16 हजार 900 रुपयांची वेगळी सूट मिळू शकते. iPhone 11 मध्ये 64GB स्टोरेज मिळेल. iPhone 11 मध्ये तुम्हाला 6.1 इंच लिक्विड रेटिना HD डिस्प्ले मिळेल. 12MP + 12MP ड्युअल रियर कॅमेरा iPhone 11 मध्ये उपलब्ध आहे. तसेच तुम्हाला यात 12MP फ्रंट कॅमेरा मिळेल.