पुण्यातील कंपनीने लाँच केली तब्बल 17 सिटर कार; फॅमिलीच काय शेजाऱ्यांनाही फिरायला न्या
यामुळे कितीही मोठी फॅमिली असली तरी या कार मध्ये परफेक्ट फिट होवू शकते. यामुळे फॅमिली पिकनिकसाठी ही कार बेस्ट ऑप्शन ठरणार आहे.
Force Urbania, पुणे : पुण्यातील यूटिलिटी व्हेईकल निर्माता कंपनी फोर्स मोटर्स ने आपली नवी जबरदस्त कार लाँच केली आहे. Force Urbania असे या नविन कारचे नाव आहे. ही कार तब्बल 17 सिटांची(17 seater) आहे. यामुळे कितीही मोठी फॅमिली असली तरी या कार मध्ये परफेक्ट फिट होवू शकते. यामुळे फॅमिली पिकनिकसाठी ही कार बेस्ट ऑप्शन ठरणार आहे. या कारमध्ये सिटींगचे तीन पर्याय देण्यात आले आहेत. याशिवाय या कारमध्ये अनेक जबरदस्त फिचर्स असणार आहेत. या कारच लुक अत्यंत आकर्षक आहे. तसेत यात सर्व लेटेस्ट फीचर्स देखील असणार आहेत. तीन वेगवेगळ्या सीटिंग कॉन्फ़िगरेशनमध्ये कंपनीने ही कार लाँच केली आहे.
10-सीटर, 13-सीटर आणि 15-सीटर असे तीन ऑप्शन ग्राहकांना मिळमार आहेत. या कारची स्टार्टींग प्राईज 28.99 लाख (एक्स-शोरूम) इतकी असणार आहे.
या कारच्या 13 सिटर व्हेरिअंटची किंमत 28.99 लाख आहे. 10-सीटर व्हेरिएंटची किंमत 29.50 लाख आहे. लांब व्हीलबेस प्रकारात येणाऱ्या या कारच्या आणखी व्हेरिंटमध्ये 17 प्रवासी बसू शकतात. याची किंमत 31.25 लाख इतकी आहे.
Force Urbania कारचे बेस्ट फिचर्स
या कारमध्ये Mercedes-Benz sourced FM 2.6-litre CR ED TCIC डिझेल इंजिन असणार आहे.
या इंजीनमध्ये 115 HP पॉवर आणि 350 Nm टॉर्क जनरेट होते.
5-स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशन गिअरबॉक्सची सुविधा
हिल होल्ड असिस्ट, इलेक्ट्रॉनिक ब्रेकफोर्स डिस्ट्रिब्युशन (EBD) सह अँटी लॉक ब्रेकिंग सिस्टम (ABS) आणि व्हेंटिलेटेड डिस्क्स
क्रॅश, रोलओव्हर पादचारी सुरक्षा नियमांचे पालन करते
ड्रायव्हर आणि को-ड्रायव्हर दोघांनाही एअरबॅगची सुवीधा
मागे बसणाऱ्या प्रवाशांसाठी 8 स्पीकरचीही व्यवस्था