Ford E-Tourneo Courier : सध्या पेट्रोल आणि डिझेलवर चालणाऱ्या वाहनांऐवजी इलेक्ट्रिक वाहनांनाच अनेकांची पसंती मिळताना दिसते. त्यातच आता एका नव्या मॉडेलची एंट्री झाली आहे. ते मॉडेल म्हणजे Ford ची E-Tourneo Courier. बाहेरून एका लक्झरी एसयुव्हीप्रमाणे दिसणारी ही कार एक इलेक्ट्रीक मिनीवॅन आहे. पण, SUV सारखा लूक असल्यामुळं ती सध्या मल्टी अॅक्टिव्ही वेहिकलच्या रुपात समोर येत आहे. या कारचे फिचर्सही इतके कमाल आहेत, की तुम्ही पाहूनच प्रेमात पडाल. 


E-Tourneo Courier चे फिचर्स आणि किंमत 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

फोर्डच्या सर्व कार्सचे फिचर्स वाहन चालवणाऱ्यांना अप्रतिम अनुभव देतात. त्याचप्रमाणं Ford E-Tourneo चे फिचर्स डिझाईन करण्यात आले आहेत. फोर्ड न्यूज यूरोपच्या माहितीनुसार या इलेक्ट्रीक मिनीवॅनमध्ये 100Kw फ्रंट व्हील ड्राईव्ह मोटर आहे. तर, सिंगल चार्जमध्ये ही कार 230 मैल म्हणजेच 370 किमी जाऊ शकते असा दावा कंपनीकडून करण्यात येत आहे. सर्वसामान्य चार्जरनं ही कार 5.7 तासांत, तर DC फास्ट चार्जरनं ती अवघ्या 10 मिनिटांत चार्ज होते. या चार्जिंगमध्ये 87 किमी दूरपर्यंत जाता येतं. तर, 100 टक्के चार्ज होण्यासाठी फास्ट चार्जवर ही कार 40 मिनिटांचा वेळ घेते. 


अद्यापही या कारची अधिकृत किंमत समोर आलेली नाही. पण, ती साधारण €23,000 (साधारण 20,57,815 रुपये) इतक्या किमतीत असू शकते. युरोपात ही कार 2024 मध्ये आणि त्यामागोमाग अमेरिकेत लाँच केली जाऊ शकते. भारतात अनेकजण येत्या काळात ती कार इंपोर्ट करू शकतात. ही एक 5 सीटर EV असून, तिला असणारं फ्रंट बंपर, व्हील, लांबलचक आऊटलूक हे गुण या कारला एखाद्या एसयुव्हीप्रमाणे लूक देतात.  


हेसुद्धा वाचा : बहुतांश AC युनिट पांढऱ्या रंगाचे का असतात? 99% लोकांना यामागचं कारणच माहित नाहीये 


भारतामध्ये मिनीव्हॅन वर्गात मारुती सुझुकी अर्टिगा, सुझुकी इको, टोयोटा इनोव्हा क्रिस्टा, होंडा मोबिलिओ, निसान एवालिया या कार्सचा समावेश होतो. यातील काही कार्स सर्रासपणे रस्त्यावर दिसतात. येत्या काळात यामध्ये फोर्डच्या या ईव्हीचा समावेश झाल्यास आश्चर्य वाटायला नको.