Aadhaar Card Update: आजच्या काळात आधार कार्ड (Aadhaar Card) हे महत्त्वाचे दस्तावेज आहे. अनेक सरकारी योजनांसाठी किंवा ओळखपत्र म्हणून आधार कार्ड जारी करावे लागते. देशात प्रत्येक नागरिकासाठी आधार कार्ड असणे अनिवार्य आहे. सरकारने आता आधार कार्ड (Aadhaar Card Update)  संबंधित एक महत्त्वाचे अपडेट जारी करण्यात आले आहे. सप्टेंबरमध्ये आधार कार्डसंबंधीत हे काम केल्यास लोकांचे पैसे वाचणार आहेत. आत्ताच जाणून घ्या आधार कार्डचे अपडेट. (UDI Aadhaar Card Update)


आधार कार्डचे नवीन अपडेट 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

युआयडीआयकडून सध्या नागरिकांना फ्रीमध्ये आधार कार्ड अपडेट करण्याची संधी देण्यात येत आहे. युआयडीआयने दिलेल्या माहितीनुसार, कागदपत्रे दाखवून फ्रीमध्ये आधार कार्ड अपडेट करण्यात येत आहे. आता 14 सप्टेंबरपर्यंत नागरिक फ्रीमध्ये आधारकार्ड अपडेच करु शकणार आहेत. या आधीपर्यंत ही मुदत 14 जून 2023 पर्यंत होती. मात्र युआयडीआयने सप्टेंबरपर्यंत मुदत वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. 


कुठे करता येणार अपडेट


युआयडीआयकडून जारी करण्यात आलेल्या गाइडलाइननुसार, नागरिक फक्त myAadhaar पोर्टलवरच फ्रीमध्ये आधार कार्ड अपडेट करु शकणार आहे. तर, आधार कार्ड केंद्रात जाऊन आधार कार्ड अपडेट करायचे असेल तर तुम्हाला तिथे शुल्क भरावे लागणार आहे. अशावेळी लोकांना 14 सप्टेंबरपर्यंत ऑनलाइन पद्धतीने आधार कार्ड अपडेट करावे लागणार आहे. 


आधार कार्ड अपडेट कसे कराल?


- नागरिक त्यांच्या आधारकार्डचा वापर करुन https://myaadhaar.uidai.gov.in/ वर लॉगइन करु शकतात. 
- पत्ता अपडेट करण्यासाठी तिथे असलेल्या पर्यायावर क्लिक करा
- त्यानंतर तुमच्या मोबाइलवर ओटीपी येईल.
- डॉक्युमेंट अपडेटवर क्लिक करा त्यानंतर तुमचे सर्व डिटेल समोर येतील.
- आधार धारकाने तपशील बरोबर आहे का याची पडताळणी करावी. जर सर्व तपशील बरोबर असेल तर पुढील हायपरलिंकवर क्लिक करावे.
- त्यानंतर ड्रॉपडाउन लिस्टमध्ये ओळखीचा पुरावा आणि पत्त्याच्या कागदपत्रांचा पुरावा निवडावा
- पत्त्याच्या पुराव्याची स्कॅन कॉपी अपलोड करावी त्यानंतर सबमिट बटणावर क्लिक करावे. 
- शेवटी आधार कार्ड अपडेटवर क्लिक केल्यावर 14 आकडी अपडेट रिक्वेस्ट नंबर जनरेट होईल.