Free Electricity Bill : वीज बिल झाले Free! पूर्ण पैसे भरल्यानंतर कंपनी देतेय कॅशबॅक
Free Electricity : तुमच्या घरचे वीज बिल फ्री झाले तर. हे वाचून तुम्हाला धक्का बसला असेल. पण कंपनी बिल भरल्यानंतर कॅशबॅक देत असल्याने वीज बिल फ्री झालेय.
Electricity Bill Payment For Users: जर तुमच्या घराचे वीज बिल दर महिन्याला वाढत असेल, तर तुम्हाला आता काळजी करण्याची गरज नाही. कारण पेटीएमने (Paytm ) मोठी ऑफर आणली आहे. ज्यामुळे वीज बिल भरल्यावर पैसे कॅशबॅक स्वरुपात मिळणार आहेत. तुम्ही वीज बिल भरले आहे आणि सर्व पैसे तुमच्या खात्यात परत आले आहेत. ही गोष्ट कुणालाही पटणारी नाही. पण आता प्रत्यक्षात असे घडत आहे की वीज बिल भरल्यानंतर संपूर्ण पैसे तुमच्या खात्यात पाठवले जात आहेत आणि अशा प्रकारे तुमच्या घराचे वीज बिल पूर्णपणे मोफत होत आहे. पेटीएमने ही ऑफर दिली आहे. तुम्हाला या ऑफरबद्दल माहिती नसेल तर आज आम्ही तुमच्यासाठी या ऑफरची संपूर्ण माहिती देत आहोत. (Free electricity bill, Cashback from Paytm company after full payments)
काय आहे ऑफर आणि ग्राहकांना काय फायदा?
पेटीएम वापरणाऱ्या ग्राहकांसाठी एक चांगली बातमी आहे. आता तुम्हाला या अॅपच्या मदतीने वीज बिल भरुन मोठा फायदा होणार आहे. खरं तर, कंपनीने 'बिजली डेज ऑफर' सुरु केली आहे, ज्यामध्ये तुम्हाला अॅपच्या मदतीने वीज बिल भरण्यावर 100 टक्क्यांपर्यंत सूट मिळण्याची संधी दिली जात आहे. याचा अर्थ असा की जर तुमच्याकडे 500 रुपयांचे वीज बिल असेल आणि तुम्ही ते भरले तर तुम्हाला संपूर्ण 500 रुपयांचा कॅशबॅक मिळण्याची चांगली शक्यता आहे, याचा अर्थ वीज बिल पूर्ण भरले जाईल. एक प्रकार तुमच्यासाठी फ्री असणार आहे.
ही ऑफर त्यांनाच मिळणार आहे की, संपूर्ण वीज बिल पेटीएमवरुन भरतील. या ऑफरशी संबंधित एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे जेव्हा ग्राहक वीज बिल 10 तारखेपासून ते 15 तारखेपर्यंत भरतील, त्यांच्यासाठीच लागू असेल. पेमेंट अॅप 100 टक्के कॅशबॅक आणि किमान 50 ग्राहकांना 2000 रुपयांपर्यंतचा लाभ दिला जाईल. आम्ही तुम्हाला सांगतो की, पहिल्यांदा बिल भरणाऱ्या वापरकर्त्यांना 200 रुपयांपर्यंतचा कॅशबॅक दिला जाईल, जरी यासाठी तुम्हाला ELECNEW200 हा प्रोमो कोड वापरावा लागेल.