आता मोफत मिळवा Amazon Prime, Disney + Hotstar चे Subscription ; कसं ते जाणून घ्या
Free OTT Subscription: जर तुम्हालाही Amazon Prime, Disney + Hotstar मोफत पाहायचे असेल तर आता ते शक्य आहे. कारण OTT वर अॅमेझॉन, नेटफ्लिक्स, डिज्नी प्लस हॉटस्टार यांसारखे माध्यम उपलब्ध झाल्यामुळं वाजवी दरात महिन्याचं सब्सक्रिप्शन मिळतं.
Free Netflix Amazon Prime Disney Hotstar Subscription : आजकाल सर्व युजर्स डिस्ने + हॉटस्टार आणि Amazon Prime असणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे. कारण सिनेमा पाहण्यासठी मल्टिप्लेक्समध्ये जाऊन महागडं तिकिट खरेदी करणे अनेकांना परवडत नाही. जर तुम्हालाही Amazon Prime, Disney + Hotstar मोफत पाहायचे असेल तर आता ते शक्य आहे. कारण OTT वर अॅमेझॉन, नेटफ्लिक्स, डिज्नी प्लस हॉटस्टार यांसारखे माध्यम उपलब्ध झाल्यामुळं वाजवी दरात महिन्याचं सब्सक्रिप्शन मिळतं. त्यामुळं ओटीटीवर मनोरंजन करणारे शो पाहण्याचा प्रेक्षकांचा कल वाढला आहे. अशातच आता सिनेचाहत्यांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे.
नवीन प्लॅनमध्ये OTT फायदे देखील उपलब्ध आहेत. आज तुम्हाला Airtel-Jio सह इतर अनेक कंपन्यांच्या प्लॅनबद्दल जाणून घ्या...
एअरटेलचा हा प्लॅन सर्वोत्कृष्ट ठरू शकतो. कारण या प्लानमध्ये तुम्हाला 200 Mbps पर्यंत सुपरफास्ट इंटरनेट सेवा मिळते.
तसेच, या प्लॅनचे वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये OTT प्लॅटफॉर्मचे सबस्क्रिप्शन देखील मिळते. यामध्ये Disney + Hotstar, Amazon Prime, Xstream Premium चे सबस्क्रिप्शन पूर्णपणे मोफत असणार आहे.
वाचा: आफताबची नार्को नाही तर पॉलिग्राफ टेस्ट होणार, नेमकं काय असेल सत्य?
जिओ 999 ब्रॉडबँड प्लॅन
Jio 999 ब्रॉडबँड प्लॅन 30 दिवसांच्या वैधतेसह येतो. या प्लानमध्ये तुम्हाला 150 Mbps स्पीड मिळेल. यासोबतच तुम्हाला अनलिमिटेड डेटा देखील दिला जातो.
परंतु जर तुम्हाला उत्तम OTT सबस्क्रिप्शनसह योजना हवी असेल तर ही तुमच्यासाठी सर्वोत्तम असू शकते. कारण प्राइम व्हिडिओच्या या सब्सक्रिप्शनमध्ये Disney + Hotstar, Voot Select, Sony Liv, Zee5, Discovery +, ALT बालाजी दिले आहेत.
एक्साइटल ब्रॉडबँड योजना
Exitel ब्रॉडबँड देखील तुमच्यासाठी सर्वोत्तम पर्याय ठरू शकतो. Excitel 592 Broadband Plan हा सर्वोत्तम पर्याय ठरू शकतो. या प्लॅनमध्ये तुम्हाला OTT सबस्क्रिप्शन मिळत नाही.
पण तुम्हाला नक्कीच 200 Mbps पर्यंत स्पीड मिळेल. तुम्ही जरी 667 ब्रॉडबँड प्लॅन घेतला तरी तुमच्यासाठी हा सर्वोत्तम पर्याय ठरू शकतो. या प्लॅनमध्ये 300 Mbps पर्यंत इंटरनेट स्पीड उपलब्ध आहे.