स्लोवाकिया : आत्तापर्यंत आपल्यापैकी अनेक लोकांनी विमानातून उड्डाण केले आहे. परंतु उडणारी कार ही आपली एक कल्पनाच आहे. आपण उडणारी कार ही फक्त हॉलीवूड आणि बॉलीवूडमधील 'Love story 2050' मध्ये पाहिले आहे. आपल्याला अशी आशा आहे की, आद्याप तरी असे होणे शक्य नाही परंतु येणाऱ्या पुढच्या काही वर्षात अशा उडणाऱ्या कार येण्याची वेळ काही लांब नाही. परंतु या उडणाऱ्या कारचा शोध लागला आहे असे सांगितले तर त्यावर विश्वास बसणार नाही. पणा हो, ही गोष्ट खरी आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आता उड्डाण करणारी हवाई कार देखील लोकांच्या भेटीला येणार आहे. त्यामध्ये बसून आपण एका ठिकाणाहून दुसर्‍या ठिकाणी प्रवास करू शकाल. 'एअरकार' (AirCar) नावाची ही कार 8000 फूटांपेक्षा जास्त उंचीवर उडू शकते आणि तिचा वेग 160 किमी प्रतितासापेक्षा जास्त आहे.


एअरकारने स्लोवाकियातील (Slovakia) दोन शहरांमधून आपले पहिले उड्डाण पूर्ण केले. या कारने दोन शहरातील अंतर हे अवघ्या तीन मिनिटांत पार केले. प्रवासानंतर ही एअर कार जमिनीवर देखील उतरली आणि अवघ्या तीन मिनिटांत ही कार स्पोर्ट्स कारमध्ये बदलली. मग तिने ब्रातिस्लावापर्यंतचे (Bratislava) अंतर पार केले.


एअरकार प्रोटोटाइप 1 मध्ये 160 हॉर्सपावरचा फिक्स-प्रोपेलर इंजिन आहे. या कारची कल्पना प्रोफेसर स्टीफन क्लेनची आहे आणि ही कार स्लोवाकियाच्या फर्म क्लेनविजनने विकसित केली आहे.


एअरकारच्या उड्डाणांच्या व्हिडिओमध्ये हे पाहिले गेले आहे की ती प्रथम हवेत उड्डाण करते आणि नंतर लँडिंग करते. लँडिंग केल्यानंतर, कार तिचे पंख फोल्ड करते आणि कारमध्ये तिचे रुपांतर होते. यानंतर ही कार  स्लोवाकियाच्या राजधानीकडे वेगाने धाव घेते.


क्लेनविजन यांनी सांगितले की, नाइट्रा से ब्रातिस्लावापर्यंतचे 35 मिनिटांचे उड्डाण हा एक महत्त्वपूर्ण टप्पा आहे. यामुळे आता कारच्या निर्मितीसाठी मदत मिळणार आहे. ही उड्डाण करणारी कार बनवणार्‍या विकासकांचे म्हणणे आहे की, या कारला सुट्टीसाठी, स्वत: उडवण्यासाठी आणि कमर्शियल टॅक्सी म्हणून वापरण्यात येऊ शकते.



एअरकार एक बीएमडब्ल्यू इंजिनने सुसज्ज आहे आणि ही पेट्रोल-पंप इंधनवर चालते. दोन लोकांची यामध्ये बसण्याची व्यवस्था आहे. भविष्यातील या वाहनांच्या किंमतीबद्दल अद्याप कोणताही खुलासा झालेला नाही. परंतु पुढच्या वर्षीपर्यंत ही कार आकाशात आणि जमीनीवर दोन्हीकडे उडताना आपल्याला पाहायला मिळेल.


प्रोफेसर स्टीफन क्लेन म्हणाले की, एअरकारही दुहेरी वाहतुकीच्या नव्या युगाची सुरुवात करेल. यामुळे वाहतुकीची नवीन कॅटेगरी समोर येईल.