Why is the color of brick is red: प्रत्येकाचं व्यक्तीचं एक स्वप्न असतं आपलं हक्काचं घर असावं. यासाठी कठोर मेहनत करुन पैसे जमवतात आणि आपल्या स्वप्नातील घर उभं करतात. पण घर बनवण्यासाठी अनेक साहित्याची गरज भासते. यासाठी सिमेंट, लाकूड, लोखंड आणि विटांची गरज भासते. यातही घराच्या बांधकामात वीट (Bricks) हा एक महत्त्वाचा घटक असतो. एक-एक वीट रचत उंचच उंच इमारत उभारली जाते. पण तुम्ही कधी विचार केला आहे का, ही वीट लाल रंगाचीच का असते? काळ्या, हिरव्या, निळ्या किंवा पिवळ्या रंगाच्या का नसतात? लाल रंगाची वीट बनवताना त्यात रंग मिसळला जातो का? (general knowledge why color of brick)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अशी तयार होते वीट
विटा बनवण्यासाठी कच्च्या मातीचा वापर केला जातो. यात 50 ते 70 टक्के वाळू मिसळली जाते. याशिवाय यात 20-30 टक्के अॅल्युमिना, 2 ते 5 टक्के चुना, 1 टक्के मॅग्नेशियम आणि 7 टक्के लोह असते. हे मिश्रन विटा बनवण्यासाठी असलेल्या साच्यात टाकून त्याला विटेचा आकार दिला जातो. काही दिवस उन्हात वाळल्यानंतर त्या आणखी मजबूत बनवण्यासाठी भट्टीत उच्च तापमानात (सुमारे 875 ते 900 डिग्री सेल्सिअस) भाजल्या जातात. 


म्हणून विटेचा रंग लाल असतो
इतक्या उच्च तापमानात लोह आणि इतर धातू मातीत मिसळले जातात. लोह आणि इतर धातूंचं ऑक्साइड अॅल्युमिना सिलिकासोबत मिळून लोह ऑक्साईड तयार होतो आणि हा लोह ऑक्साईड विटांना लाल रंग देतो. लाल मातीच्या भाजीव विटा अतिशय मजबूत मानल्या जातात. त्यामुळे बांधकामात लाल विटांचा मोठ्याप्रमाणावर वापर होतो. तसेच या विटांच्या किमतीही आवाक्यात असते. त्यामुळे सर्वसाधारणपणे भाजीव लाल विटांनाच सर्वाधिक मागणी असल्याचे दिसते


भाजलेल्या विटांवर आग किंवा वातावरण याचा विशेष परिणाम होत नाही तसंच त्यांची रचाई सोपी आणि जलद होते. यांमुळे भिंतीसाठी किंवा पाऊलवाट, पदपथ, छपरे, कॉंक्रीट इत्यादींसाठीही विटांचा वापर केला जातो.  बांधकाम करताना विटा एका हाताने सहज उचलता येतील असं आकारमान आणि आकार त्यांना दिलेला असतो. भारतामध्ये बहुतेक लहान गावांत अजूनही विटा हातांनीच तयार करतात किंवा साच्यात प्रत्येक वेळी एकच वीट तयार होते. काही ठिकाणी 22×22×7 सेंमी व काही ठिकाणी 19×9×9 सेंमी. अशा मापाच्या विटा बनवितात.