900 रुपयांपेक्षाही कमी किंमतीत 200Mbps इंटरनेट स्पीड, धमाकेदार ऑफर
सध्याच्या काळात सुपरफास्ट इंटरनेटची मागणी वाढली
नवी दिल्ली : सध्याच्या काळात सुपरफास्ट इंटरनेटची (Superfast Internet) मागणी वाढली आहे. एकावेळेस लोकांना 50 एमबीपीएस खूप वाटायचे पण आता 100 एमबीपीएसचा इंटरनेट वेगही (Internet Speed) कमी वाटू लागला आहे. दरम्यान, एका कंपनीने ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी 200 एमबीपीएस प्लानची ऑफर केली आहे. नवीन ऑफर काय आहे ते जाणून घ्या.
खासगी ब्रॉडबँड इंटरनेट कंपनी Siti Broadband एक उत्तम योजना घेऊन आली आहे. telecomtalk च्या वृत्तानुसार, कंपनी ग्राहकांचे लक्ष आपल्याकडे खेचण्यासाठी सुपर फास्ट इंटरनेट ऑफर घेऊन आली आहे. सिटी ब्रॉडबँडने 'Mega' नावाची नवीन 200 एमबीपीएस फायबर ब्रॉडबँड योजना सुरू केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, या जबरदस्त योजनेसाठी युजर्सना केवळ 899 रुपये द्यावे लागतील. विशेष म्हणजे सिटी ब्रॉडबँड देशातील नऊ राज्यांत आपली सेवा देत आहे.
त्यामध्ये दिल्ली, हरियाणा, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, राजस्थान, उत्तर प्रदेश, ओडिशा, उत्तराखंड आणि तेलंगणा यांचा समावेश आहे. आपल्या खाजगी टेलिकॉम कंपन्या सध्या 100Mbps स्पीडचे ग्राहकांकडून 600 ते 900 रुपये घेतात.