Netflix आणि Amazon Prime चं Subscription फ्री; JIO, VI आणि Airtel च्या या Plans मध्ये आहेत offers
लोकं आजकाल Netflix आणि Amazon Prime या OTT platform वरती जास्त ऍक्टीव्ह असतात. कारण त्यावर नवनवीन वेब सीरीज रीलिज होतात आणि नवीन सिनेमा सुद्धा पहायला मिळतात. काही लोक सबक्रिप्शन विकत घेतात, तर काही लोक ते पाहण्यासाठी अगदी पायरसी साइटचा वापर करतात. पण या पायरसी साइटमुळे मोबाईल किंवा लॅपटोपमध्ये वायरस येतात, तर काही वेळेला हे सगळ होऊ नये म्हणून आपल्याला खूपचं जास्त काळजी घ्यावी लागते.
मुंबई : लोकं आजकाल Netflix आणि Amazon Prime या OTT platform वरती जास्त ऍक्टीव्ह असतात. कारण त्यावर नवनवीन वेब सीरीज रीलिज होतात आणि नवीन सिनेमा सुद्धा पहायला मिळतात. काही लोक सबक्रिप्शन विकत घेतात, तर काही लोक ते पाहण्यासाठी अगदी पायरसी साइटचा वापर करतात. पण या पायरसी साइटमुळे मोबाईल किंवा लॅपटोपमध्ये वायरस येतात, तर काही वेळेला हे सगळ होऊ नये म्हणून आपल्याला खूपचं जास्त काळजी घ्यावी लागते.
पण तुम्हाला माहित आहे? यापेक्षा सोपा उपाय बाजारात उपलब्ध आहे, आणि तो पण फ्री मध्ये. आता Airtel, JIO आणि Viच्या मोबाईल रिचार्ज प्लॅन्स बरोबर Netflix आणि Amazon Prime चा फ्री सबस्क्रिप्शन मिळत आहे.
पाहुयात कोणत्या प्लॅन्सवर तुम्हाला काय फायदा आहे.
JIO च्या या प्लॅन्सवर आहे फ्री सबस्क्रिप्शन
तुम्ही जर JIO कार्ड वापरत असाल, तर तुमच्यासाठी ही Good news आहे. कारण JIO च्या काही पोस्टपेड प्लॅन्स बरोबर Netflix आणि Amazon Prime चा फ्री सबस्क्रिप्शन मिळत आहे.
JIO च्या 399 रुपये, 599 रुपये, 799 रुपये, 899 रुपये आणि 1,499 रुपयांच्या पोस्टपेड प्लॅन्सवर Netflix आणि Amazon Prime चा फ्री सबस्क्रिप्शन मिळत आहे. (Free Subscription)
Vi प्लॅन्स बरोबर सुद्धा मिळत आहे फ्री सबस्क्रिप्शन
Vi (Vodafone- Idea) ही कंपनी सुद्धा आता तुम्हाला पोस्टपेड प्लॅन्सवर फ्री सबस्क्रिप्शन (Free Subscription) देणार आहे.
माहितीनुसार 1,099 रुपयांच्या पोस्टपेड प्लॅन्सवर Netflix आणि Amazon Prime चा फ्री सबस्क्रिप्शन (Free Subscription) देणार.
Airtelही देणार फ्री ऑफर्स
दुसऱ्या कंपनी सारखे एयरटेल त्याच्या कोणत्याच प्लान प्लॅन्सवर तुम्हाला नेटफ्लिक्सचं फ्री सबस्क्रिप्शन (Free Subscription) देत नाही. पण एयरटेलच्या 499 रुपयांच्या प्लॅन्सवर Amazon Primeचं सबस्क्रिप्शन फ्रीमध्ये मिळेल.
Netflix सबस्क्रिप्शन किंमत
Netflix तुम्हाला 4 सबस्क्रिप्शन प्लॅन ऑफर करतो. Netflix सबस्क्रिप्शन 199 रुपये, 499 रुपये आणि 649 रुपयांचे आहेत. Netflix चा प्रीमियम प्लॅन 799 रुपयांमध्ये उपलब्ध आहे.
Amazon Prime ची किंमत
तुम्ही फक्त 129 रुपये देऊन Amazon Primeचं महिन्या भराचं सबस्क्रिप्शन (Subscription) घेऊ शकता. तर 999 रुपयात तुम्ही वर्ष भराचं सबस्क्रिप्शन (Subscription) घेऊ शकता.