`फ्री इनकमिंग कॉल सेवा` बंद होवू शकते, मोबाइल यूझर्ससाठी मोठा `धक्का`
एअरटेल, व्होडाफोन यांसारख्या टेलीकॉम कंपन्यांना झालेल्या तोट्यानंतर, या कंपन्यांना आपल्या धोरणात बदल करावा लागत आहे.
मुंबई : एअरटेल, व्होडाफोन यांसारख्या टेलीकॉम कंपन्यांना झालेल्या तोट्यानंतर, या कंपन्यांना आपल्या धोरणात बदल करावा लागत आहे. रिलायन्स जिओ एन्ट्रीमुळे कंपन्यांना सलग स्वस्त आणि फ्री कॅाल देऊन नुकसान झाले आहे. त्यामुळे कंपन्यांचा रोख त्यांच्या धोरणात बदल करण्याचा आहे. कंपनी लवकरच फ्री इनकमिंग सेवा बंद करु शकते. त्यासाठी कंपनीने मिनीमम रिचीर्ज प्लान लॉन्च करणे सुरु केलं आहे. भरपूर दिवसांपासून मिळत असलेली मोफत इनकमिंग सेवा बंद होऊ शकते.
वॅलिडीटी प्लानमधील बदल
इकोनॉमिक टाइम्स बातमीनुसार एअरटेल, व्होडाफोन आपल्या सरासरीवर रेव्हेन्यूला वाढवण्यासाठी जोर देत आहे. तसेच त्यांचा फोकस त्या ग्राहकांवर आहे, ज्यांना फायदा मिळतो. कंपनीने इनकमिंग सेवेसाठी २८ दिवसांचा प्लान लॉन्च केला आहे.
आता ग्राहकांना इन्कमिंग कॅालसाठी प्रत्येक महिन्याला रिचार्ज करावा लागणार आहे. यासाठी कंपन्यांनी ३ प्रकारचे प्लान सादर केले आहेत. यात ३५, ६५, ९५ रुपयांचे प्लान आहेत. या सर्व प्लानची वॅलिडीटी २८ दिवस असणार आहे. २९ व्या दिवशी आऊटगोईंग बंद केली जाणार आहे.
काय होणार बदल ?
कंपन्यांनी अशा ग्राहकांची यादी तयार केली आहे, ज्यात फक्त इन्कमिंगवर आपलं कनेक्शन चालवतात. जेव्हा गरज पडते, त्यावेळी किमान रक्कम रिचार्ज करतात. अशा ग्राहकांमुळे कंपन्यांना ARPU - Average revenue per user मध्ये नुकसान होत आहे.
व्होडाफोन इंडियाच्या एका वरिष्ठ अधिकारीने सांगितले की, टेलीकॅाम सेक्टरला यावेळेस प्राइज वॉरने घट्ट धरलयं. त्यामुळे कंपन्यानी असा पाऊल उचललं आहे.
कोणत्या ग्राहकांची सेवा होणार बंद ?
कंपन्या फक्त त्या ग्राहकांच इन्कमिंग सेवा बंद करणार, जे नियमित रिचार्ज करत नाही. काही दिवसांपासून बघण्यात येत आहे की, असे काही ग्राहक आहेत, जे फक्त इनकमिंगवर आपलं कनेक्शन चालवत आहेत.
इनकमिंग चालू ठेवण्यासाठी रिचार्ज करावा लागेल. सलग रिचार्ज करणारे आणि मोठ्या कालावधीचा प्लानची निवड करणाऱ्यांना काहीच अडचण होणार नाही.
किती दिवसानंतर बंद होणार इन्कमिंग सेवा ?
कंपन्यांच्या टॉपअप रिचार्जवर ग्राहकांना टॅाक टाईम मिळायचा. तसेच महिन्याची मुदत मिळत असे. मुदत संपल्यानंतर ग्राहकांची आउटगोइंग सेवा बंद केली जात होती. पण इन्कमिंग सेवा चालू असायची.
इन्कमिंग सेवा चालू ठेवण्यासाठी महिन्यात एका वेळेस रिचार्ज करावा लागेल. रिचार्ज केलेल्या तारखेनंतर ४५ दिवस इन्कमिंग सेवा बंद होणार नाही. त्यानंतर रिचार्ज नाही केल्यास सेवा बंद करण्यात येणार आहे.
काय आहे किमान प्रिपेड प्लान?
एअरटेल, व्होडाफोन यांनी प्रिपेड ग्राहकांसाठी जी योजना काढलेली आहे, त्यात किमान रक्कम ३५ रुपये आहे. ३५ रुपयांचा रिचार्ज केल्यावर ग्राहकांना २६ रुपयांचा टॉकटाईम मिळणार आहे.
तसेच त्याची अवधी २८ दिवसांचा असणार आहे. २८ दिवसानंतर शिल्लक असूनही आऊटगोईंग बंद होणार आहे. दुसऱ्यांदा रिचार्ज केल्यावर या आधीचं शिल्लक त्यात जोडली जाणार आहे.
काय होणार तोटा ?
व्होडाफोनचे एक वरिष्ठ अधिकारी म्हणतात, कंपन्यांना तोटा होण्याची शक्यता आहे. कारण खूप ग्राहक आहेत, ते फक्त इन्कमिंग कनेक्शनवर आहेत. अशा ग्राहकांना यादीमधून वगळावे आहे. कनेक्शन बंद केल्यामुळे ग्राहक कमी होतील.
तसेच एअरटेलचे चीफ एक्झीक्यूटीव्ह ऑफिसर गोपाल विठ्ठल यांना अपेक्षा आहे की, यामुळे तिसऱ्या महिन्यातच कंपनीचा ARPU - Average revenue per user सुधारता येणार आहे.