जिओचा फोन बूक केला आहे तर मग जाणून घ्या कधी मिळेल
रिलायन्स जिओच्या 4G VoLTE फिचर फोनची सर्वचजण आतुरतेने वाट पाहत होते. अनेकांनी या फोनची प्री-बुकींग केली
नवी दिल्ली : रिलायन्स जिओच्या 4G VoLTE फिचर फोनची सर्वचजण आतुरतेने वाट पाहत होते. अनेकांनी या फोनची प्री-बुकींग केली. मात्र, काहींना प्री-बुकींग करता आली नाहीये. तुम्हाला सुद्धा बुकींग करता आलेली नाहीये तर मग तुम्हाला आता आणखीन काही काळ वाट पहावी लागणार आहे. कारण, रिलायन्स जिओने जिओफोनची बुकींग काही काळासाठी बंद केली आहे.
पण जर तुम्ही जिओचा फोन बूक केला असेल तर तो तुम्हाला कधी मिळेल याची माहिती घेण्यासाठी तुम्हाला तुमच्या फोनमध्ये माय जिओ अॅप इन्सटॉल करावा लागेल. त्यावरुन तुम्ही मोबाईलचं स्टेटस ट्रॅक करु शकता.
माय जिओ अॅप इन्स्टॉल केल्यानंतर Manage booking वर क्लिक करा. आता तुम्ही फोन प्री बुकिंगचा नंबर तेथे टाका. त्यानंतर तुमचा फोन ट्रॅक होईल. सोबतच तुम्ही 18008908900 वर कॉ करुन देखील त्याची माहिती घेऊ शकता.
फोनची प्री-बुकिंग ५०० रुपयामध्ये करण्यात आली होती. तर डिलिवरीच्या वेळेस तुम्हाला १००० रुपये द्यावे लागणार आहे. त्यानंतर ३ वर्षांन तुम्हाला १५०० रुपये रिफंड होणार आहे. आता जिओने बुकींग बंद केली असून पून्हा बुकींग कधी सुरु होणार यासंदर्भात अद्याप माहिती मिळू शकलेली नाहीये. कंपनीतर्फे सांगण्यात आले आहे की, बुकींग लवकरच सुरु करण्यात येईल.