मुंबई : फ्लिपकार्टच्या 'बिग बिलीयन सेल' घोषणेनंतर अॅमेझॉनने 'ग्रेट इंडियन फेस्टिवल सेल' ची घोषणा केली आहे. अॅमेझॉन २१-२४ सप्टेंबरच्या दरम्यान आपल्या 'ग्रेट इंडियन फेस्टिव्हल सेल'चे आयोजन करणार आहे. अॅमेझॉन या सेलमध्ये टॉप मोबाइल फोन ब्रँड, इलेक्ट्रॉनिक आयटम्स, कपड्यांवर भरघोस सवलत देत आहे. अॅमेझॉन विक्री २१ सप्टेंबरपासून सुरू होईल, परंतु त्याचे प्राइम मेंबर २० सप्टेंबरच्या दुपारपासून सेलमध्ये सहभागी होऊ शकतील.


४०,००० हून अधिक ऑफर


अॅमेझॉन ४ दिवसांच्या विक्रीत ४०,००० हून अधिक ऑफर देणार आहे. प्रत्येक तासाला नवी ऑफर येणार आहे. मोबाइल फोनवर ५०० हून अधिक ऑफर असतील त्याच वेळी, अॅमेझॉन फॅशनवर २५०० हून अधिक, होम आणि किचनमध्ये १०,००० पेक्षा अधिक आणि ३०,००० हून अधिक ऑफर असणार आहेत. अॅमेझॉन एक्सक्लूझीवमधून ६,००० हून अधिक ऑफर असणार आहेत.