gmail features : जर तुम्ही Gmail वापरकर्ता असाल तर आमच्याकडे तुमच्यासाठी अनोखे features ची माहिती आहे. जसे व्हॉट्सअॅपवर disappearing messages असणारे फिचर आहे. तसेच Gmail वर देखील मेल (disappearing) गायब देखील करू शकता. तुम्ही Gmail वर येणारे मेल पटकन टाईप करू शकता आणि चुकीचे मेलला अनसेंड करू शकता. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

महत्त्वाचे मेल मिस होणार नाहीत : तुम्ही जीमेलवर महत्त्वाच्या मेल्सला 'स्टार' करू शकता आणि इतकेच नाही तर वेगवेगळ्या रंगीत तारे वापरून तुम्ही तुमचे महत्त्वाचे मेल वेगवेगळ्या श्रेणींमध्ये विभागू शकता. अशा प्रकारे तुमचे महत्त्वाचे मेल कधीही मिस होणार नाहीत.


Smart Compose फीचर : 'स्मार्ट कंपोज' तुम्हाला मेल लिहिताना तुमच्या वाक्याप्रमाणे असतील अशा शब्दांच्या सूचना देईल. त्या सूचनांचा वापर करून तुम्ही पटकन टाईप करून मेल पाठवू शकाल. या फीचरमुळे तुम्ही तुमचे मेल पटकन टाइप करू शकाल.


Gmail Confidential Mode : या मोडच्या मदतीने तुम्ही तुमचा मेल पाठवण्यापूर्वी एक्सपायरी डेट निवडू शकता. त्यानंतर तो मेल गायब होईल. असे म्हणता येईल की हे फीचर व्हॉट्सअॅपच्या गायब फीचरसारखे काम करते.


पाठवलेले मेल अनसेंड करा: जीमेलच्या 'अनसेंड' (unsend) फीचरमुळे तुम्ही मेल पाठवल्यानंतरही ते अनसेंड करू शकता. तुम्ही मेल पाठवताच तुम्हाला स्क्रीनच्या शेवटी  पर्याय दिसेल. जीमेलच्या सेटिंग्जमध्ये जाऊन त्याची वेळ मर्यादा बदलली जाऊ शकते.