नवी दिल्ली :  अनेकांनी आतापर्यंत विविध टीव्ही पाहिले असतील. पण कधी २४ कॅरेट गोल्डचा टीव्ही पाहिलाय का? नुकताच ब्रिटेनच्या एका कंपनीने असा टीव्ही लॉन्च केला आहे. हा टीव्ही एक्वाव्हिजन  (Aquavision) नावाच्या ब्रिटीश कंपनीने बनवला आहे. ही कंपनी अशाच प्रकारचे लक्झरी टिव्ही बनवते. कंपनीने हॅरोड्स नावाच्या एका नाइट्सब्रिज स्टोरमध्ये गोल्ड प्लेटेट असलेला हा टीव्ही विक्रीसाठी ठेवला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हा टीव्ही केवळ खऱ्या सोन्यापासूनच बनलेला नाही, तर याचे स्पेसिफिकेशन्सही अतिशय खास आहेत. यात एलईडी स्क्रिन (LCD Screen) लावण्यात आली आहे. विशेष बाब म्हणजे १०० इंची हा टीव्ही वॉटरप्रुफ आहे. यात अतिशय सुंदर आणि क्लियर फोटोसाठी 4k डेफिनेशन देण्यात आलं आहे. या टीव्हीला साऊंड सिस्टमही जबरदस्त देण्यात आलं आहे.


या टीव्हीची किंमत १,०८,००० पाउंड म्हणजेच भारतीय रुपयांनुसार, जवळपास १ कोटी रुपये असण्याचं सांगण्यात येत आहे. हा टीव्ही खासकरुन उच्चभ्रू वर्गातील लोकांना लक्षात घेता बनवण्यात आल्याचं बोललं जात आहे. लोक टेक्नोलॉजीमध्ये काहीतरी नव-नवीन शोधण्यासह आता आपलं स्टँडर्डही जपणं पसंत करताना दिसतात.