JIO बाबत मोठी बातमी...तुम्हीही जिओ युजर्स आहात का?
रिलायन्स जिओबाबत मोठी बातमी समोर आलीये. कंपनीने फीचर फोन मार्केटमध्ये दिग्गज स्मार्टफोन कंपनी सॅमसंगलाही मागे टाकलंय. जिओ आता फीचर फोन मार्केटमध्ये नंबर वन कंपनी बनलीये.
नवी दिल्ली : रिलायन्स जिओबाबत मोठी बातमी समोर आलीये. कंपनीने फीचर फोन मार्केटमध्ये दिग्गज स्मार्टफोन कंपनी सॅमसंगलाही मागे टाकलंय. जिओ आता फीचर फोन मार्केटमध्ये नंबर वन कंपनी बनलीये.
जिओने हे यश अवघ्या 4 महिन्यांत मिळवलेय. विशेष गोष्ट म्हणजे जिओ नव्या फोनबाबत आणखी प्लान करतेय. रिलायन्स जिओ केवळ डेटाच्या बाबतीतच दुसऱ्या कंपन्यांशी स्पर्धा करत नाहीये तर हँडसेट विक्रीमध्येही ती इतर कंपन्यांना चांगलीच टक्कर देतेय. फीचर फोन मार्केटमध्ये पहिल्यांदा असं घडलंय की एखाद्या कंपनीने सॅमसंगला मागे टाकलंय.
शिपमेंटमध्ये जिओ नंबर-1
हाँगकाँग स्थित रिसर्च फर्म काऊंटरपॉईंटनुसार डिसेंबरच्या तिमाहीत फीचर फोन शिपमेंटमध्ये जिओ अव्वल स्थानी राहिला. भारतातील फीचर फोन मार्केटमध्ये सॅमसंगचे प्रमाण 17 टक्के इतके आहे. मायक्रोमॅक्स तिसऱ्या स्थानी आहे. यानंतर चीनचे आयटेल आणि नंतर नोकियाचा नंबर लागतो.
फ्री डेटाचा मिळाला फायदा
जिओ फोनसह केवळ 1500 रुपयांमध्ये फ्री व्हॉईस कॉलिंगसह 4जी डेटा मिळतो. 1500 रुपयेही तीन वर्षानंतर रिफंड होतात. जिओचे हे डेटापॅक इतर कंपन्यांच्या तुलनेत स्वस्त आहेत. याच कारणामुळे जिओने सॅमसंगला मागे टाकलंय. एका रिसर्चनुसार जिओ फोन आल्याने मार्केटमध्ये फीचर फोनची मागणी वाढलीये.
15 मिलियनहून अधिक जिओ फोनची विक्री
ऑक्टोबर-डिसेंबरच्या तिमाहीत रिलायन्स जिओने 15 मिलियनहून अधिक जिओ फोन्सची विक्री केली.
26 जानेवारीपासून जिओ ग्राहकांना मिळणार हे फायदे
जिओने 26 जानेवारीपासून आपले प्लान्स आणि डेटापॅकमध्ये बदल केलेत. काही प्लान्समध्ये 50 टक्क्यांहून अधिक डेटा मिळणार आहे. ज्या प्लान्समध्ये 1 जीबी डेटा मिळत होता त्या प्लान्समध्ये 1.5 जीबी डेटा मिळणार आहे. तसेच 4 प्लान्सची किंमत आणि व्हॅलिडिटीमध्येही बदल होणार आहे.