मुंबई : गूगल आता भारतीय भाषांमध्ये नवनवे प्रयोग आणि सोयी सुविधा उपलब्ध करून देत आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भारतामध्ये आजापासून गूगल असिस्टंट ही सेवा हिंदीमध्येही सुरू करण्यात आली आहे. 


कोणत्या फोनवर होणार उपलब्ध? 


गूगल असिस्टंट  हिंदी ही सेवा अ‍ॅन्ड्रॉईड फोन  6.0+ वर सुरू होणार आहे. लवकरच अ‍ॅन्ड्रॉईड 5.0,लॉलिपॉप,आयफोन वरही ही सुविधा उपलब्ध होणार आहे. 


रिलायंस जिओ फीचर फोन आणि गूगलचं इन्स्टंट मेसेजिंग प्लॅटफॉर्म अ‍ॅलोवर गूगल असिस्टंटची सेवा हिंदीमध्ये उपलब्ध आहे.  


भारतीयांसाठी होणार अधिक सोयीस्कर 


भारतीयांना त्यांच्या गरजेनुसार आवश्यक माहिती इंग्रजीसोबतच भारतामध्ये अनेक ठिकाणी बोलल्या जाणार्‍या भाषेत म्हनजेच हिंदीत उपलब्ध होणार आहे. 


इतर 30 भाषांचाही समावेश होणार  


2018 च्या वर्ष अखेरीस ही सुविधा अजून 30 भाषांमध्ये उपलब्ध होणार आहे. हिंदीमध्ये माहिती मिळवण्यासाठी तुम्हांला डिवाईसची भाषादेखील हिंदी  निवडावी लागेल. 


सध्या गूगल असिस्टंट ही सेवा 8 भाषांमध्ये उपलब्ध आहे. लवकरच ती 30 इतर भाषांमध्येही उपलब्ध होणार आहे.