वॉशिंग्टन : गुगलचा सीईओ सुंदर पिचाई यांना कंपनीकडून एक मोठ्ठं बक्षीस मिळतंय. गूगलकडून  सीईओ पिचाईंना तब्बल 38 करोड डॉलर्सचा (जवळपास 2525 करोड  रुपये) नजराणा सादर करण्यात आलाय. 2014 मध्ये पिचाई यांना कंपनीकडून 3 लाख 53 हजार 939 रेस्ट्रिक्टेड शेअर मिळाले होते... हे शेअर्स पिचाई आता कॅश करणार आहेत. काही अटींनंतर रेस्ट्रिक्टेड शेअर्स कुणीही आपल्या खात्यावर कॅश करू शकतात. 'अल्फाबेट'मध्ये प्रोडक्टचे सिनिअर व्हाईस प्रेसिडेन्टच्या पदावर प्रमोशन होण्यापूर्वी एक वर्ष अगोदर पिचाई यांना हे शेअर्स मिळाले होते. प्रमोशन मिळाल्यानंतर पिचाई यांनी सहसंचालक लॅरी पेज यांच्या जबाबदाऱ्या आपल्या खांद्यावर घेतल्या होत्या. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मूळचे चेन्नईचे असणारे पिचाई 2015 साली गूगलच्या सीईओ पदावर बसले होते. हे शेअर्स त्यांना जेव्हा मिळाले तेव्हा ते कंपनीत सिनिअर व्हाईस प्रेसिडेन्ट पदावर काम पाहत होते. पिचाई गूगल कंपनीत 2004 पासून जोडले गेलेले आहेत. 


पिचाई यांचं पहिलं प्रोजेक्ट प्रोडक्ट मॅनेजमेंट आणि इनोव्हेशन ब्रान्चमध्ये होतं. गूगल सर्च टूलबारमध्ये सुधारणा करणं आणि दुसऱ्या ब्राऊजरचं ट्राफिक गुगलवर आणणं हे त्यांचं काम होतं. यावेळी, त्यांनी गूगलला आपला ब्राऊजर लॉन्च करण्याचा सल्ला दिला होता. त्यामुळेच ते लॅरी पेज यांचे खास बनले.


पिचाई हे पहिले व्यक्ती नाहीत ज्यांना कंपनीकडून एवढ्या मोठ्या रकमेचं गिफ्ट मिळालंय. याअगोदर फेसबुकचे सीईओ मार्क झुकरबर्ग यांना ऑगस्ट 2012 मध्ये सहा करोड शेअर कॅश केल्यानंतर 15174 करोड रुपये मिळाले होते.