मुंबई: इंटरनेट विश्वातील सर्वात मोठे सर्च इंजिन गुगलने आजचे डूडल खास व्यक्तिमत्वासाठी बनवले आहे. गुगलचे आजचे डूडल हे जर्मनीच्या महान रसायन शास्त्रज्ञा मार्गा फॉलस्टिचना (Marga Faulstich) यांच्यावर बनवले आहे. फॉलस्टिच यांची आज (१६ जून) १०३वी जयंती आहे. त्यांचा जन्म १६ जून १९१५ मध्ये झाला होता. त्यांच्या नावावर विविध ४० पेटंट आहेत.


जगातील पहिल्या महिला एग्जिक्युटिव


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

फॉलस्टिच यांनी जवळपास ३०० प्रकारच्या काचेवर काम केले. १९२२मध्ये त्यांचे कुटुंबिय जर्मनीच्या जेना शहरात स्थलांतरीत झाले. इथेच त्यांचे सुरूवातीचे शिक्षण झाले. १९३५मध्ये त्यांनी पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. शिक्षण पूर्ण करताच त्यांनी SCHOTT AG(स्कॉट एज) नावाने स्वतंत्र कंपनी सुरू केली. SCHOTT AG मध्ये त्यांनी ४४ वर्षे काम केले. या काळात त्यांच्या नावावर ४० पेंटट नोंदवली गेली. या पेंटटसोबतच जगातील एखाद्या कंपनीची पहिली महिला एग्जिक्युटिव होण्याचा मानतही फॉलस्टिच यांच्या नावावर आहे.


खास काच बनवणारी जगप्रसिद्ध कंपनी


आजच्या डूडलमध्ये गुगलने त्यांच्या विविध गुणांचा आणि कार्याचा कोलाज बनवला आहे. आजच्या डूडलमध्ये त्यांनी आपल्या डोळ्यांवर दोन काचा ठेवल्याचे दिसते. डूडलवर क्लिक करताच एक स्वतंत्र पेज ओपन होते. स्कॉट एज ही कंपनी ऑप्टिकल लेन्स आणि स्पेशल काच बनवणारी कंपनी म्हणून जगात प्रसिद्ध आहे.