`फादर ऑफ मोंटाज`: गुगलने बनवले सेर्गेई आईसेन्स्टाईनचे डूडल
जगाच्या उन्नतीसाठी आणि लोकांच्या आनंदसाठी ज्यांनी कोणी हातभार लावला अशा निवडक लोकांवर गुगलचे बारीक लक्ष असते. म्हणूनच अशा लोकांच्या जयंती किंवा पुण्यतिथी दिवशी गुगड डूडल बनवून त्यांना आदरांजली वाहते.
नवी दिल्ली: जगाच्या उन्नतीसाठी आणि लोकांच्या आनंदसाठी ज्यांनी कोणी हातभार लावला अशा निवडक लोकांवर गुगलचे बारीक लक्ष असते. म्हणूनच अशा लोकांच्या जयंती किंवा पुण्यतिथी दिवशी गुगड डूडल बनवून त्यांना आदरांजली वाहते. आजचे डूडल पाहूनही अनेकांना विचार पडला असेल की आज काय विशेष?
चित्रपटाच्या दुनियेतील 'फादर ऑफ मोंटाज'
आज (सोमवार,२२ जानेवारी) गुगलने सेर्गे आईसेन्स्टाईनचे गुडल बनवले आहे. सेर्गे आईसेन्स्टाईन हा सोव्हियत रशियाचा चित्रपट निर्माता. आज त्याची १२०वी जयंती. त्याला चित्रपटाच्या दुनियेतील 'फादर ऑफ मोंटाज' म्हणूनही ओळखले जाते.सोव्हियत रिशियाच्या या चित्रपट निर्मात्याचा जन्म लातविया येथे २२ जानेवारी १८९८मध्ये झाला. खरे तर त्यांची कौटुंबिक पार्श्वभूमी ही आर्किटेक्चर इंजीनियरिंगची. त्याचे वडील हे आर्किटेक्चर इंजीनियर होते. त्यामुळे त्यानेही वडिलांच्या पावलावर पाऊल टाकत आक आर्किटेक्चर इंजिनिअरींगचे शिक्षण घेतले. पण, त्यात तो रमला नाही. त्याची ओढ चित्रपटांकडेच होती.
बोल्शेविक क्रांतीमध्येही सहभाग
दरम्यान, बोल्शेविक क्रांतीमध्येही त्याने महत्त्वपूर्ण योगदान दिले. या क्रांतीत सहभागी होता यावे यासाठी तो रेड आर्मीतही सहभागी झाला. याच काळात त्याचे लक्ष नाट्यक्षेत्राकडे खेचले गेले. दिवसेंदिवस त्याची ही आवड वाढत गेली. त्यामुळे तो मॉस्को येथे आला. तेथे त्याने डिजायनर म्हणून काम करण्यास सुरूवात केली.
१९२३मध्ये सेर्गेर आईसेन्स्टाईनने चित्रपट विचारवंत म्हणून काम करण्यास सुरूवात केली. १९२५ मध्ये त्याचा पहिला चित्रपट 'स्ट्राईक' प्रसिद्ध झाला. हा एक सायलेंट चित्रपट म्हणून ओळखला जातो. त्यानंतर सेर्गेची 'बॅटलशिप पोटेमकिन'(१९२५), आणि ऑक्टोबर (१९२८) प्रदर्शीत झाली. या चित्रपटांनी त्याला खरी ओळख मिळवून दिली.
पहिल्यांदाच केला मोंटाजचा वापर
'बॅलटलशिप पोटेमकिन' या चित्रपटात सेर्गेने पहिल्यांदा मोंटाज हा प्रकार लोकांसमोर आणला. या मोंटाजच्या माध्यमातून त्याने अनेक शॉट्स क्रमवारपणे या चित्रपटात त्याने मांडले. त्याच्या या कल्पकतेने लोक प्रचंड प्रभावीत झाले. या प्रकाराला सेर्गेने 'इंटेलेक्चुअल मोंटाज' असे म्हटले.
अल्पायुष्यात प्रचंड काम
सेर्गेला आयुष्यात प्रचंड लोकप्रियता मिळाली पण, तितकीच टीकाही सहन करावी लागली. तो अवघे ५० वर्षांचेच आयुष्य जगला पण, तेवढ्या आयुष्यातही तो प्रचंड लोकप्रिय ठरला. हृदयविकाराच्या धक्क्याने १९४८मध्ये त्याने अखेरचा श्वास घेतला.