मुंबई : गूगलच्या नव्या डूडलची सध्या चर्चा होत आहे. गूगलने कोरोना योद्धांचे आभार मानणारे डूडल बनवले आहे. यात डॉक्टर, नर्स , शेतकरी, शिक्षक, स्वच्छता कर्मचारी, किराणा व्यावसायिक, आत्पकालिन सेवा देणाऱ्या सर्वांचे चित्राद्वारे आभार मानण्यात आले आहेत. कोरोना काळात सेवा बजावणाऱ्यांना कोरोना योद्धांना गूगलने डूडल तयार करीत त्यांना समर्पित केले आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

देशात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. असे असताना कोरोनासाठी झटणाऱ्यांसाठी गूगलने डूडल तयार करत त्यांचे आभार मानले आहेत. गूगलने आपल्या डूडलमार्फत 'कोरोना वॉरियर्स' म्हणजेच कोरोनाविरुद लढणाऱ्या तसेच लढा देणाऱ्यांना थँक्यू म्हटले आहे. या व्यक्ती सतत आपल्याला सेवा देत आहेत. गूगलने यासाठी खास डूडल तयार केले आहे. कोरोनाविरुद्ध लढा देणाऱ्या आणि लोकांच्या मतदीसाठी तप्तर असणाऱ्यांप्रती आदर व्यक्त केला आहे.


डूडलमार्फत खास धन्यवाद देण्यात आले आहेत. याआधी गूगलने शिक्षक, लोकांपर्यंत आवश्यक सेवा पोहोचवणारे पॅकेजिंग, शिपिंग आणि डिलिवरी वर्कर्सना धन्यवाद दिले होते. आता कोरोना विषाणूशी लढाणाऱ्या डॉक्टर्स आणि परिचारिकांचे आभार मानन्यासाठी डूडल तयार केले आहे. तसेच जीवघेण्या आणि महामारीची साथ पसरविणाऱ्या कोरोना व्हायरसपासून वाचण्यासाठी आवश्यक टीप्सही दिल्या आहेत.