सॅन फ्रान्सिस्को : गुगलमध्ये काम करणाऱ्या तीन माजी महिला कर्मचाऱ्यांनी पगारात पुरुष आणि महिलांमध्ये भेदभाव केला जात असल्याचा आरोप केला आहे. यासाठी त्यांनी कोर्टातही धाव घेतली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

फोर्च्युनमध्ये आलेल्या वृत्तानुसार सॉफ्टवेअर अभियंता, कम्यूनिकेशन विशेषज्ञ आणि व्यवस्थापक या पदावर असलेल्या तीन माजी महिला कर्मचाऱ्यांनी गुगलविरोधात कोर्टात धाव घेतली आहे. 


कॅलिफोर्नियातील गुगलच्या कार्यालयात आम्ही काम करतो. येथे आम्हाला पुरुषांच्या तुलनेत कमी पगार दिला जातो. मात्र पुरुषांचे आणि आमचे काम सारखच आहे. त्याचप्रमाणे काही वेळा आम्हाला असे काम दिले जाते की त्याद्वारे आमची पदोन्नती होण्याती शक्यता कमी असते. असा आरोप कोर्टात दाखल केलेल्या याचिकेत त्यांनी केला आहे. 


गुगलमध्ये नोकरी मिळणे म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे. भरमसाठ पगार आणि  सुख-सुविधा त्या कर्मचा-यांना मिळतात. इतर मोठ्या कंपनीत मिळणाऱ्या सुविधांपेक्षा गुगलच्या कर्मचा-यांना मिळणाऱ्या सुख-सुविधा नक्कीच वरचढ आहेत. त्यामुळे गुगलच्या कर्मचा-यांबद्दल हेवा वाटणे साहजिकच आहे. पण गुगलमध्ये काम करणा-या कर्मचा-यांना असे अजिबात वाटत नाही. 


मात्र माध्यमांच्या वृत्तानुसार समोर आलेलं वास्तव वेगळेच आहे. गुगलमध्ये काम करणाऱ्या तीन माजी महिला कर्मचाऱ्यांनी पगारात पुरुष आणि महिलांमध्ये भेदभाव केला जात असल्याचा आरोप केला आहे. यासाठी त्यांनी कोर्टातही धाव घेतली आहे.