नवी दिल्ली : गुगलने गुगल प्ले इंस्टेंट लॉन्च केले आहे. या फिचरच्या मदतीने युजर्स प्ले स्टोरमध्ये गेमचे प्रीव्हू पाहु शकाल. याचा अर्थ प्ले स्टोर अॅप इनस्टॉल आणि डाऊनलोड केल्याशिवायच तुम्ही गेमचे प्रीव्हू पाहु शकाल. गुगल प्ले इंस्टेंट, गुगल प्ले स्टोर, गुगल प्ले गेम्स आणि अन्य प्लेटफॉर्म्स गेम्य उपलब्ध आहे.


गुगल प्ले गेम्य अॅपशी संबंधित अन्य फिचर्स


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गुगलने गुगल प्ले गेम्स अॅपच्या रिडिझाईन्सची घोषणा केली आहे. यात अनेक नवे फिचर्स उपलब्ध करुन दिले आहेत. गुगलने प्ले गेम्स अॅपमध्ये नवे UI अपग्रेड्स करण्यासोबतच नव्या इंस्टेंट कॅटेगरी सादर केल्या आहेत. अपडेट करण्यासोबत अॅपने  Arcade टॅब देण्यात आली आहे. याच्या अंतर्गत युजर्स व्हिडिओ ट्रेलर्स देखील पाहु शकाल. त्याचबरोबर त्यात सर्च टॅब अपडेट करण्यात आला आहे. याच्या अंतर्गत अनेक फिल्टर्स देण्यात आले आहे. फिल्टर्सच्या मदतीने तुम्हाला गेम्स शोधायला कॅटगरी देण्यात आली आहे. अन्य UI अपग्रेड्ससह फुल स्क्रीन स्क्रीनशॉट्स आणि डिव्हाईस कम्पेटिबिलिटी साठी नवीन ड्राप डाऊन मेन्यू सुरू करण्यात आले आहे.


काय आहे कंपनीचे म्हणणे...


अॅपमध्ये काही ठराविक गेम्ससाठी नवीन गुगल प्ले इंस्टेंट टॅब देण्यात आले आहे. गुगल प्ले इंस्टेंटच्या प्रॉडक्ट मॅनेजर जोनाथनने सांगितले की, गुगल प्ले इंस्टेटच्या माध्यमातून फक्त एका टॅबमध्ये डाऊनलोड केल्याशिवायही गेम ट्राय केले जातील. हे फिचर १ बिलियन अॅनरॉईड डिव्हाईसेस वर वैश्विक स्तरावर उपलब्ध केले जाणार आहे.