Google Pay : आता बातमी तुमच्या कामाची. तुम्ही गूगल अकाऊंट वापरत आहे. तर गूगल तुमच्यासाठी 'पासकीज' ही नवी सेवा घेऊन आली आहे. त्यामुळे तुम्ही गूगलचा पासवर्ड विसरलात तरी चिंता नाही. कारण आता तुमचं गूगल अकाउंट मोबाईल प्रमाणे फिंगर प्रिंट, फेस स्कॅन किंवा पिन स्क्रिन द्वारे ओपन करता येणार आहे. या नव्या सुविधेमुळे तुम्हाला गूगल अकाऊंट, जीपेसुद्धा वापरता येणार आहे. विशेष म्हणजे OTP पेक्षा ही सुविधा अधिक सुरक्षित असेल फिशिंग किंवा हॅकिंगपासून यूजर्सची सुटका होईल असा दावा गूगलने केला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

Google ची UPI आधारित पेमेंट सेवा Google Pay ही डिजिटल व्यवहारांसाठी लोकप्रिय आहे. आता कंपनी बायोमेट्रिक आणि पिन फॉरमॅटऐवजी दुसरे फिंगरप्रिंट किंवा फेशियल रेकग्निशन स्कॅन लागू करुन पेमेंट ऑथेंटिकेशनसाठी अधिक सोयी-सुविधा आपल्या सेवेत जोडत आहे. याचा लाभ हा ग्राहकांना होणार आहे. त्यामुळे सुरक्षित पेमेंट करता येणार आहे. त्यामुळे कोणताही धोका असणार नाही, असा दावा गूगलकडून करण्यात आला आहे.


Google Pay ही डिजिटल व्यवहारांसाठी आतापर्यंत अनेक जण केवळ 4 अंकी पिन  वापरुन व्यवहार करता येत होता. आता फेस आणि फिंगरप्रिंट ऑथेंटिकेशन देखील मिळणार आहे. परंतु कॅच म्हणजे फक्त Android 10 चालणारे डिव्हाइस यावर ही सुविधा असणार आहे. याचे कारण म्हणजे Google ने Android 10 अ‍ॅप फ्रेमवर्कमध्ये बायोमेट्रिक्स सपोर्ट असणार आहे. 4-6 अंकी पिन अजूनही राहील. कारण UPI पिन अंमलबजावणी हे संपूर्ण व्यवहाराचे मुख्य वैशिष्ट्य आहे आणि Google Pay साठी ते आता असणार नाही.यापुढे फेशियल रेकग्निशन स्कॅन तसेच फिंगरप्रिंट या सुविधेमुळे ते असणार नाही.


सध्या Google Pay च्या नवीन अ‍ॅप आवृत्तीवर जे v2.100 आहे. Android 9.0 हे सध्याच्या सर्वात लोकप्रिय Android आवृत्तींपैकी एक होते. यात हे शक्य आहे की Google या उपकरणांना बायोमेट्रिक प्रमाणीकरण सपोर्ट देण्यासाठी त्याचे फ्रेमवर्क अपडेट करण्याचा विचार करत आहेत. Google ने Google Pay साठी नवीन अपडेट आणणार आहे.


Google Pay India ला अजूनही UPI वरील सर्व व्यवहारांसाठी UPI पिन आवश्यक आहे. बायोमेट्रिक्स UPI साठी पर्याय नाही, असेही सूचित करण्यात आले आहे. बायोमेट्रिक्स डिव्हाइस लॉक सेट करण्यासाठी वापरले जाऊ शकतात आणि ते Google Pay अ‍ॅप अनलॉक करण्यासाठी वापरले जाऊ शकतात. दरम्यान, पिन-आधारित सुरक्षिततेपेक्षा बायोमेट्रिक सुरक्षेचे अनेक फायदे आहेत. पिन लक्षात ठेवणे कधीकधी त्रासदायक ठरु शकते. त्यामुळे गूगल आता फेस स्कॅनचा पर्याय पुढे आलाय.