मुंबई : आपल्याला दरोरोजच्या वापरासाठी वेगवेगळे अ‍ॅप्स बाजारात उपलब्ध आहेत. त्यामुळे आपण ते गुगल प्ले स्टोअरवर जाऊन लगेच डाऊनलोड करतो आणि तो अ‍ॅप वापरायला सुरवात करतो. परंतु असे ही काही अ‍ॅप असतात जे आपल्या मोबाईलला  मालवेयरच्या माध्यमातून धोकादायक ठरणारे असतात. ते आपला डेटा चोरुन घेताता आणि त्याचा गैरवापर करतात. त्यामुळे आता गुगलने अँड्रॉइड प्ले स्टोअरवरील 17 मालवेयर अ‍ॅप्स काढूव टाकले आहेत. Google च्या मते, हे 17 अ‍ॅप्स ग्राहकांच्या मोबाइलला धोकादायक ठरु शकतात.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

त्यामुळे ग्राहकांची प्रायव्हसी लक्षात घेता, गुगलने प्ले स्टोअरवरून असे अ‍ॅप्स काढून टाकले आहेत. कंपनीच्या म्हणण्यानुसार या अ‍ॅप्समध्ये जोकर मालवेयर सापडला आहे. अशा परिस्थितीत, गुगलकडू यूझर्सना असा सल्ला देण्यात आला आहे की, आपण त्वरित आपल्या फोनवरून हे अ‍ॅप्स काढूण टाकावेत.


रिपोर्ट्सनुसार, हे समोर आले आहे की, जोकर (Bread) मालवेअर प्ले स्टोअरवर उपस्थित असलेल्या 17 अ‍ॅप्समध्ये आहे. कोणत्याही अ‍ॅपमध्ये धोकादायक मालवेयर सापडताच Google त्याला त्याच्या प्लॅटफॉर्मवरुन काढून टाकते. यावेळीही गुगलने असे धोकादायक अ‍ॅप्स डिलीट केले आहेत.


त्याचबरोबर, गुगलने प्रोटेक्ट डिसेबल सेवा देखील सुरू केली गेली आहे. परंचु ज्यांच्या फोनमध्ये हे अ‍ॅप्स आधीपासून आहेत. त्यांना ते स्वतःच हटवावे लागतील.


त्यामुळे तुमच्या फोनमध्ये खालीलपैकी, कोणते अ‍ॅप्स असतील तर ते आत्ताच अनइंस्टॉल करा.


All Good PDF Scanner


Mint Leaf Message-Your Private Message
Unique Keyboard – Fancy Fonts and Free Emoticons
Tangram App Lock
Direct Messenger
Private SMS
One Sentence Translator – Multifunctional Translator
Style Photo Collage
Meticulous Scanner
Desire Translate
Talent Photo Editor – Blur focus
Care Message
Part Message
Paper Doc Scanner
Blue Scanner
Hummingbird PDF Converter – Photo to PDF
All Good PDF Scanner


जोकर किती धोकादायक आहे?
जेडस्केलरच्या मते, हे स्पायवेअर यूझर्सचे SMS, संपर्क आणि डिव्हाइसमधील माहिती चोरण्यासाठी डिझाइन केलेले आहे. तसेच, हे यूझर्सच्या नकळत  प्रीमियम वायरलेस ऐप्लिकेशन प्रोटोकॉल (WAP)सर्विसेज साइन अप करण्यास अनुमती देते. गूगल सुरक्षा टीमला फसवून जोकर प्ले स्टोअरवर समोर आलेली ही तिसरी घटना आहे.


गेल्या महिन्यातही गुगलने प्ले स्टोअर वरून 6 अॅप्स काढले होते. वर्षाच्या सुरूवातीला, गूगलने ब्लॉग पोस्टमध्ये असेही सांगितले की, जोकर अलीकडच्या काळात समोर आलेला सर्वात प्रगत आणि धोकादायक मालवेअर आहे.